शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये असताना सोनाक्षीच्या हनिमूनचे रोमँटिक फोटो व्हायरल!

Sonakshi Sinha | बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालसोबत लग्न बंधनात अडकली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली.

लग्नानंतर सोनाक्षीने आपल्या जवळच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. त्यात बॉलीवुडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, लग्नाच्या दोनच दिवसांनी शत्रुघ्न सिन्हांची तब्येत बिघडली.त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. त्यांना भेटायला सोनाक्षी (Sonakshi Sinha) आणि झहीर रुग्णालयात देखील गेले होते.

सोनाक्षीच्या लग्नानंतर बिघडली शत्रुघ्न सिन्हांची तब्येत

अशात सोनाक्षीच्या हनिमूनचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत. सध्या शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुलगा लव सिन्हाने मंगळवारी दिली. एकीकडे शत्रुघ्न सिन्हा हे आजारी असताना दुसरीकडे सोनाक्षीने सोशल मीडियावर हनिमूनचे फोटो पोस्ट केले आहेत.

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये झहीरसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. लग्नाच्या नऊ दिवसांनंतर सोनाक्षी आणि झहीर हनिमूनला गेले आहेत. त्यांचे हे फोटो आता चर्चेत आले आहेत. एकीकडे वडील शत्रुघ्न सिन्हा आजारी असताना सोनाक्षीने रोमँटिक फोटो पोस्ट केल्याने ती नेटकऱ्यांच्या नजरेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सोनाक्षीची (Sonakshi Sinha) चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षी आणि झहीर यांचे रोमँटिक फोटो व्हायरल

सोनाक्षीसह (Sonakshi Sinha) झहीर देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सोनाक्षी सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतोय. या दोघांनी 23 जून रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर ‘बॅस्टियन’ या हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं.

Sonakshi Sinha And Zaheer

सोनाक्षीच्या लग्नादरम्यान शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोनाक्षीच्या नात्याला त्यांनी विरोध केल्याचं देखील म्हटलं गेलं. मात्र, शत्रुघ्न सिन्हांनी (Shatrughan Sinha) ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. शिवाय ते लग्नात आनंदी देखील दिसत होते. “माझ्या मुलीने काहीही बेकायदेशीर किंवा असंवैधानिक काम केलेलं नाही. लग्न दोन लोकांमधील खासगी निर्णय आहे. कोणाला देखील यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.”, असं शत्रुघ्न सिन्हा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

News Title –  Sonakshi Sinha And Zaheer Romantic Photo Viral

महत्वाच्या बातम्या-

सावधान! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

पुण्यात आढळले झिकाचे 7 रुग्ण; काय आहेत लक्षणं

चांदी सूसाट तर सोन्याने टाकला दरवाढीचा गिअर, काय आहेत आजच्या किंमती?

तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं आहे का? हे तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? जाणून घ्या एका क्लिकवर