Somwati Amavasya 2024 Date l हिंदू धर्मात चैत्र अमावस्येला विशेष महत्त्व आहे. विशेषत: सोमवार आणि शनिवारी येणारी अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. यावेळी चैत्र अमावस्या खूप खास आहे. कारण हा दिवस सोमवार असल्याने सोमवती अमावस्येशी एकरूप आहे. पूर्वजांसह शिवाची पूजा करण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी मानला जात नाही. तर आज आपण 2024 च्या पहिल्या सोमवती अमावस्येची तारीख आणि पुजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊयात.
सोमवती अमावस्या 2024 तारीख :
या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या 8 एप्रिल 2024 रोजी आहे. ही चैत्र महिन्यातील अमावस्या असणार आहे. अमावस्या आणि सोमवार या दोन्ही दिवशी शिवपूजा विशेष मानली जाते. अशास्थितीत या दिवशी दुप्पट फळ मिळते.
Somwati Amavasya 2024 Date l सोमवती अमावस्या 2024 वेळ काय आहे? :
यंदाच्या वर्षी चैत्र अमावस्या सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी पहाटे 03:21 वाजता सुरू होईल तर रात्री 11.50 वाजेपर्यंत असणार आहे.
स्नान- दान मुहूर्त – सकाळी 04.32 ते 05.18
शिवपूजेची वेळ – सकाळी 09.13 ते 10.48
पितरांना अर्पण – सकाळी 11.58 ते दुपारी 12.48 पर्यंत
Somwati Amavasya 2024 Date l सोमवती अमावस्येचे महत्त्व :
शास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या स्त्रिया श्रावण सोमवती अमावस्येचे व्रत करतात आणि शिवाची पूजा करतात त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते. त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या कल्याणासाठी या दिवशी मैदा, तांदूळ, तूप आणि साखर दान करा. सोमवती अमावस्येमुळे व्रत करणाऱ्याला अखंड सौभाग्य, सुख, यश आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी स्नान करून शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
News Title : Somwati Amavasya 2024 Date
महत्त्वाच्या बातम्या :
या खेळाडूने मुंबई इंडियन्सला घाम फोडून पटकावली ऑरेंज कॅप; किंग कोहलीच काय?
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर ठाकरेंचा गंभीर आरोप!
हार्दिकच्या चुकीमुळे मुंबईला बसला मोठा फटका; ब्रेट लीने शेअर केला अनुभव
‘या’ दिग्गज कलाकारांनी अभिनयासोबतच राजकारणातही उमटवलाय विजयाचा ठसा!
मुंबईच्या संघात ‘राजकारण’! हार्दिक विरूद्ध रोहित ‘सामना’, खेळाडू विभागले






