‘थोडी तरी लाज बाळग’; तिसऱ्या पत्नीसोबतच्या त्या फोटोंमुळे नेटकरी शोएब मलिकवर भडकले

On: March 29, 2024 2:45 PM
Social Media Users Target Shoaib Malik and Sana Javed
---Advertisement---

Shoaib Malik | पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिल्याचं म्हटलं गेलं. यामुळे शोएबला अजूनही टार्गेट केलं जात आहे.

शोएब कुठेही गेला की त्याला चाहत्यांच्या रागाला सामोरं जावं लागत आहे. सानियासोबत घटस्फोट झाल्यनंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. नुकताच शोएबने तिसऱ्या पत्नीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो त्याने सोशल मिडियावर पोस्ट केले आणि नेटकऱ्यांनी टीकेचा भडिमारच सुरू केला.

शोएबने आपल्या तिसऱ्या पत्नीसोबत आनंदाचे क्षण सोशल मिडियावर पोस्ट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र शोएब आणि सना यांचे फोटो व्हायरल होत आहेत. शोएब आणि सना यांचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्याला खडेबोल सुनावले.

शोएबवर नेटकऱ्यांचा संताप

या फोटोवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दोन्ही देशांचे नागरिक शिव्या देत आहेत’, दुसरा नेटकरी म्हणाला,‘असं काम केलंय दोन्ही देशांचे नागरिक तुमचा तिरस्कार करत आहेत…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘रमजान सुरु आहे थोडी तरी लाज बाळग…’, ‘2024 मधील कोणालाही न आवडलेलं कपल…’, फोटो पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत सानिया मिर्झा हिचं समर्थन करत आहेत.

शोएबच्या तिसऱ्या लग्नावर फक्त भारतच नाही तर पाकिस्तानने देखील विरोध दर्शवला. पाकिस्तानच्या बऱ्याच सिलेब्रिटींनीही त्याच्यावर टीका केली. त्यामुळे अजूनही शोएबला सोशल मिडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सानिया मिर्झा आणि मुलाची साथ सोडून नवा संसार थाटल्यामुळे शोएबचा (Shoaib Malik) दोन्ही देशांकडून विरोध केला जात आहे.

शोएबचे तिसऱ्या पत्नीसोबत ‘ते’ फोटो व्हायरल

दरम्यान, शोएब आणि सानिया यांनी 2010 मध्ये लग्न केलं होतं. तेव्हा अनेकांनी दोघांच्या लग्नाचा विरोध केला. कारण सानियासोबत शोएबचं दुसरं लग्न होतं. त्यातच शोएबने 2024 च्या सुरुवातीच्याच महिन्यात सना जावेद हिच्याशी लग्न करत सर्वांना धक्का दिला. एका शूटदरम्यान त्यांची भेट झाली. नंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी लग्न केलं. यामुळे शोएबला (Shoaib Malik) भारतासह पाकिस्तानमधूनही टार्गेट करण्यात येत आहे.

News Title : Social Media Users Target Shoaib Malik and Sana Javed

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सवर लज्जास्पद विक्रमाची नोंद

हार्दिक पांड्याला संघातून काढणार?, ‘या’ तडाखेबाज खेळाडूमुळे हार्दिकचं करिअर सापडलंय संकटात

चित्रपट चालत नसल्याने राजकारणात एंट्री?; कंगनानं अखेर सांगितलं कारण

‘राम सातपुते खोट्या गरिबीचा…’; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Hardik Pandya सारखा का धरतो स्वतःच्या गोलंदाजीचा आग्रह?, T20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर

Join WhatsApp Group

Join Now