Palash Mucchal | सध्या सोशल मीडियावर आणि क्रीडा वर्तुळात सर्वाधिक चर्चा होत आहे ती टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या अचानक रद्द झालेल्या लग्नाची. सांगलीतील फार्महाऊसवर 23 नोव्हेंबर रोजी हा भव्य विवाहसोहळा पार पडणार होता. मेहेंदी, संगीत यांसारख्या विधींची सुरुवातही झाली होती. मात्र लग्नाच्या अगदी काही तास आधी दोन्ही कुटुंबांनी लग्न पुढे ढकलत असल्याची घोषणा केली. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याकारणाने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आले. पण आता या घोषणेनंतर अनेक वेगळे दावे, चर्चित चॅट्स आणि नवे ट्विस्ट समोर येत आहेत. (Smriti Mandhana Marriage)
अचानक रद्द झालेल्या लग्नानंतर सतत नवी माहिती समोर येत असल्याने चाहत्यांत संभ्रम आणि चर्चा वाढली आहे. काही माध्यमांमध्ये पलाश मुच्छलवर स्मृतीची फसवणूक केल्याच्या चर्चा रंगू लागल्या. काही चॅट्स लीक झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र या चॅट्सची सत्यता कोणत्याही अधिकृत स्त्रोताने अद्याप मान्य केलेली नाही. तरीही सोशल मीडियावर या स्क्रीनशॉट्सचे प्रचंड व्हायरल होणं थांबलेलं नाही.
राधा यादवचं पाऊल आणि वाढता गोंधळ :
या चर्चांच्या पार्श्वभूमीवर स्मृती मानधनाची टीम इंडियातील जवळची मैत्रीण राधा यादवने (Radha Yadav) अचानक पलाश मुच्छलला (Palash Mucchal) इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं लक्षात आलं. स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याला राधासारख्या विश्वासू मैत्रिणीने अचानक अनफॉलो करणं हे चाहत्यांच्या आणि चाहत्यांच्या नजरेत मोठा संकेत मानलं जात आहे. लग्नाआधी काहीतरी गंभीर घडल्याचा हा स्पष्ट इशारा असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे पलाश अजूनही इन्स्टाग्रामवर राधा यादवला फॉलो करतो.
त्याचवेळी लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतीने स्वतःच्या इन्स्टाग्रामवरील लग्नाशी संबंधित सर्व व्हिडिओ डिलिट केले. पलाशनेही (Palash Mucchal) त्याच्या अकाउंटवरील लग्नाच्या पोस्ट हटवल्या आहेत. तरीही जुन्या फोटोंना दोघांनीही हात लावलेला नाही. हे पाहून दोघांमध्ये खरोखर काही तणाव आहे का, की फक्त वेळेचे भान ठेवून दोघे शांतता पाळत आहेत, याबद्दलचे प्रश्न अधिक तीव्र झाले आहेत.
Palash Mucchal | मेरी डिकॉस्टाच्या चॅट चर्चेचा खुलासा :
या संपूर्ण गोंधळात आणखी एक नाव पुढे आलं मेरी डिकॉस्टा (Mary D’costa). तिच्याशी पलाशच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट समोर आल्याचा दावा करण्यात आला होता. हे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये आणखी चर्चा निर्माण झाली. मात्र मेरी डिकॉस्टाने स्वतः पुढे येऊन या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं. तिने सांगितलं की, “पलाशसोबत माझं बोलणं मे-जुलै 2025 दरम्यान फक्त एक महिनाभर झालं. माझं त्याच्याशी कोणतंही नातं नव्हतं.”
मेरी पुढे म्हणाली, “मी स्मृती मानधनाचा खूप आदर करते. हे सर्व लोकांना स्पष्ट व्हावं म्हणून मी चॅटचे स्क्रीनशॉट पोस्ट केले. मी कोरिओग्राफर नाही आणि माझ्याकडून कोणताही गैरसमज व्हावा अशी इच्छा नव्हती.” तिच्या या वक्तव्याने काही संशय दूर झाले असले, तरी संपूर्ण प्रकरणावर पडलेला गूढ पडदा अद्याप हटलेला नाही. (Smriti Mandhana Marriage)
लग्न पुढे ढकललं असलं तरी या सर्व घटनांनी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न, तर्कवितर्क आणि अनुत्तरित शंका निर्माण केल्या आहेत. स्मृती आणि पलाश दोघांनीही या प्रकरणावर अद्याप कोणतेही थेट स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या नात्यात पुढे काय घडते, हे पाहण्यासाठी सर्वांची नजर त्यांच्या पुढील हालचालींकडे लागली आहे.






