Sitaram Yechury l माकपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांचे आज निधन झाले आहे. सीताराम येचुरी हे 72 वर्षांचे होते, तसेच ते दीर्घकाळ आजारी देखील होते. अशातच त्यांनी आज दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन :
सीताराम येचुरी यांना श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे दिल्ली एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होता. येचुरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर उपचार करत होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
येचुरी यांनी 2015 मध्ये प्रकाश करात यांच्या जागी सीपीएमचे सरचिटणीसपद स्वीकारले होते. येचुरी यांनी 1974 मध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सामील होऊन राजकारणाला सुरुवात केली होती. काही दिवसांनी ते CPI(M) चे सदस्य झाले. आणीबाणीच्या काळात येचुरी यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते.
Sitaram Yechury l राहुल गांधींनी केला शोक व्यक्त :
सीताराम येचुरी यांच्या निधनावर राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, सीताराम येचुरी जी एक मित्र होते. त्यांना भारताची सखोल जाण होती आणि ते भारताच्या विचारसरणीचे रक्षक होते.
दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही येचुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, सीताराम येचुरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. मी त्यांचे कुटुंब, मित्र आणि जवळच्या लोकांप्रती शोक व्यक्त करते.
News Title – Sitaram Yechury Death
महत्त्वाच्या बातम्या-
मनोज जरांगेंचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर जोरदार हल्ला!
… तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा; ‘या’ नेत्याचं आवाहन
टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?






