आता आरोपींची खैर नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT ला मिळाला महत्त्वाचा पुरावा

On: January 6, 2025 6:14 PM
Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडून सुरु आहे. या प्रकरणी सीआयडीला आणि एसआयटीला अत्यंत महत्त्वाचा पुरावा मिळालाय. यामुळे आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झालीये.

काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते. ते व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले. मात्र हे व्हिडीओ एसआयटींनी रिकव्हर केले आहेत.

SIT ला मिळाला महत्त्वाचा पुरावा

सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ एसआयटीने मोबाईलमधून डिलीट केलेला. मात्र पोलिसांनी हा डाटा मिळवला आहे. एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केलेत.

संतोष देशमुख यांना मारताना जो लाकडी दांडका वापरला आहे, तो न्यायालयात सादर केला आहे. मारहाणीत वापरलेले तलवारीसारखे शस्त्र आहे. तसेच लोखंडी रॉड आणि कोयता एसआयटीने न्यायालयात सादर केला आहे.

वाल्मिक कराड फरार होताना आणि शरण येताना वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे, अशी माहिती सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे. सुदर्शन घुले आणि विष्णु चाटे यांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारी वकिलांनी विष्णू चाटेच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मुंडे-कराडांच्या जमिनी कुठे-कुठे? सुरेश धस यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट

संतोष देशमुखांच्या हत्येचं 3333 कनेक्शन, खळबळजनक माहिती समोर

लिव्हरचे 4 तुकडे, मान तुटलेली, बरगड्या पण…, मुकेश चंद्राकरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सगळे हादरले

सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार?

पुन्हा लॉकडाऊन लागणार?; धडकी भरवणारी बातमी समोर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now