36 तासांपासून बेपत्ता असलेले आमदार वनगा अखेर घरी परतले; पण मध्यरात्री पुन्हा..

On: October 30, 2024 8:37 AM
Shrinivas Vanga finally returned home
---Advertisement---

Shrinivas Vanga | शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना अश्रुच अनावर झाले होते. त्यांनी आपलं दुःख सर्वांसमोर मांडत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. विधानसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे ते तणावात असल्याचं त्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या. त्यानंतर आमदार वनगा हे गेल्या 36 तासांपासून नॉट रीचेबल होते. घरी कुणालाही काहीही न सांगता ते निघून गेले होते. यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले होते. (Shrinivas Vanga)

आमदार वनगा यांनी तिकीट दिलं नाही म्हणून आत्महत्येची भाषा केली होती. त्यातच ते दोन्ही फोन बंद करून घरातून गायब झाले होते.यामुळे त्यांच्याबद्दल आणखीनच चिंता वाढली होती. यामुळे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला गेला. पण, ते कुठे आहेत याचा काहीच पत्ता लागला नाही.  अखेर 36 तासांनंतर आमदार वनगा हे स्वतः घरी परतले. ते इतका वेळ कुठे होते, त्यांनी नेमकं घर का सोडलं होतं?, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले, पण..

श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) हे पालघरमधील आपल्या घरी आले होते. त्यांनी कुटुंबीयांशी काहीवेळ बातचीत केली. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे कुटुंबीयांना सांगून पुन्हा घराबाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा हे रात्री दोन ते तीनच्या दरम्यान घरी आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशीही संपर्क साधल्याचे समजते.

सोमवारी संध्याकाळपासून ते आपल्या एका मित्राच्या घरी होते. ते सध्या प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत. शांत झाल्यावर ते घरी आले. आमच्याशी बोलून ते पुन्हा घराबाहेर पडले, असं श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने म्हटलं आहे. मात्र, वनगा पुन्हा कुठे गेले, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

श्रीनिवास वनगा 36 तास कुठे होते?

दरम्यान, शिंदे गटाकडून पालघर विधानसभेतून (Palghar Vidhan Sabha) राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडावेळी आमदार श्रीनिवास वनगादेखील सूरत आणि गुवाहाटीला गेले होते. शिंदेंसोबत गेलेल्या 40 पैकी 39 आमदारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे. मात्र, श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलंय.

तिकीट मिळालं नाही म्हणून, वनगा हे प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी माध्यमांसमोरच शिंदे यांच्यावर हल्ला करत उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं होतं. उद्धव ठाकरे हेच फक्त शब्दाचे पक्के आहेत, त्यांच्यासोबत केलेल्या गद्दारीची शिक्षा मी भोगतोय, असं म्हणत श्रीनिवास वनगा हे माध्यमांसमोर ढसाढसा रडले होते. यानंतर ते 36 तास गायब झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री उशीरा श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga)कोणालाही पत्ता लागून न देता घरी आल्याचे सांगितले जाते. कुटुंबियांशी भेट घेऊन ते आता पुन्हा घराबाहेर पडले आहेत.

News Title : Shrinivas Vanga finally returned home

महत्वाच्या बातम्या –

आज मासिक शिवरात्री, भोलेनाथ ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!

“मी सिंगल…”, अर्जून कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल सर्वात मोठा खुलासा!

“जगून काय फायदा म्हणून त्यांनी असं..”, श्रीनिवास वनगांच्या बायकोने शिंदेंवर केला गंभीर आरोप

ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारण आलं समोर

खुशखबर! ‘या’ बँकांकडून मिळतंय सर्वात स्वस्त होम लोन

Join WhatsApp Group

Join Now