ठाकरे गटाच्या नेत्यांचा श्रीकांत शिंदेंविरोधात लढण्यास नकार?; आता ‘हे’ नावं चर्चेत

On: March 26, 2024 8:52 PM
Lok Sabha Election Results 2024
---Advertisement---

Shrikant Shinde | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्पातील उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहेत. अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविरोधात ठाकरे गटातून कोणता उमेदवार उभा राहणार हे पाहणं गरजेचं आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरोधामध्ये ठाकरे गट कोणता नेता देईल, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्यास नकार दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होऊ लागली आहे.

कल्याणमधून श्रीकांत शिंदेंवरोधात ‘हा’ नेता लढणार?

ठाकरे गटाला श्रीकांत शिंदेंविरोधात लढत देणारा नेता मिळत नाही. यामुळे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार उभा करणार असल्याच्या चर्चा आहेत. उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक वरूण देसाईंपासून ते सुषमा अंधारे यांचं नाव चर्चेत होतं. त्यांनी नकार दिल्यानं ठाण्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचं नाव चर्चेत आहे.

विरोधक येण्याआधीच प्रचार आणि सभांना सुरूवात

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविरोधात अद्यापही उमेदवार नाही. तोवर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेस सुरूवात केली आहे. “देशात चारशे पार तर राज्यात 45 पार हे डोळ्यासमोर ठेवा”, असा प्रचार केला आहे.

“येत्या निवडणुकीमध्ये कोणाला मत द्यायचं हे ठरवलं आहे. महायुतीचे नेते निवडून येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व करतील”, असं श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले आहेत.

“कल्याण बदलत आहे. कल्याणच्या विकासकामांवर लोकं समाधानी आहेत. कल्याणमध्ये बदल घडत असून कात टाकत आहे.  2014 मध्ये अडीच लाखांच्या मताहून अधिक मत होतं. 2019 मध्ये साडे तीन लाखाहून अधिक मत होतं. यंदा त्याहून अधिक मतानं लोकं निवडून देणार असल्याचं”, श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

News Title – Shrikant Shinde Against Who Will Candidate From Thackeray Group

महत्त्वाच्या बातम्या

विराट ‘नंबर वन’! किंग कोहलीची ऐतिहासिक खेळी, ठरला पहिला भारतीय

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

 

Join WhatsApp Group

Join Now