भाजपमध्ये बंडखोरीला सुरवात? ‘या’ नेत्याची सागर बंगल्यावर धाव

On: October 21, 2024 1:41 PM
Maharashtra
---Advertisement---

Vidhansabha Election l अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या 99 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. यावेळी भाजपच्या पहिल्याच उमेदवारी यादीमुळे बंडखोरीचे वारे वाहायला सुरुवात देखील झाली आहे. कारण या बंडखोरीला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून सुरवात होण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये बंडखोरीला सुरवात :

भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आता या मतदारसंघातून भाजपच्या जुन्या पदाधिकारीअसलेल्या सुवर्णा पाचपुते या देखील इच्छूक होत्या. त्यामुळे आता प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सुवर्णा पाचपुते यांच्याकडून थेट बंडाचा इशारा देण्यात आला आहे.

भाजप पक्षाने पुन्हा बबनराव पाचपुते कुटुंबीयांनाच तिकीट दिल्याने सुवर्ण पाचपुते या प्रचंड नाराज असल्याचे समजत आहे. मात्र आता या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईतील सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत.

उमेदवारी न मिळाल्याने डोळ्यात अश्रू :

याशिवाय आमदार बबनराव पाचपुते आणि जिल्हा परिषद माजी सदस्या प्रतिभा पाचपुते हे दोघेही त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना विधानसभा उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते. मात्र आता भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली.

तसेच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात एकप्रकारे नाराजी नाट्य देखील पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने अगदी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले आहेत.

News Title : Shrigonda Vidhansabha Election 2024

महत्वाच्या बातम्या –

शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर; कोणाकोणाला मिळणार संधी?

‘अजितदादांनी शब्द फिरवला’; भाजपाची यादी जाहीर होताच समर्थकांची बंडाची भूमिका

सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात?, ‘हा’ घरगुती उपाय नक्की देईल आराम!

मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ मेट्रो स्थानकाला भीषण आग, मोदींनी नुकतंच केलतं उद्घाटन

राज्यात पुन्हा मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून हायअलर्ट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now