शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! दिग्गज नेत्यांची उपस्थिती

On: February 19, 2026 11:18 AM
Shiv Jayanti
---Advertisement---

Shiv Jayanti | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावागावांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावरही पहाटेपासूनच मोठी गर्दी उसळली असून मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय सोहळे पार पडले.

शिवनेरीवर शासकीय सोहळ्यांचा थाट :

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी गडावर रात्रीपासूनच भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी गडावर उपस्थित राहून अभिवादन केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक जल्लोषात जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवून जन्मसोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली. किल्ल्यावर शासकीय कार्यक्रमांना विशेष स्वरूप देण्यात आले होते.

शिवाई देवी मंदिरातही धार्मिक विधी पार पडले. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi) यांच्या हस्ते शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक करण्यात आला. गड परिसरात जयजयकाराचा निनाद होत होता. राज्यातील विविध भागांमध्येही मिरवणुका आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कल्याणमध्ये 422 किल्ल्यांच्या नावांचा वापर करून शिवछत्रपतींचे तेजस्वी पोर्ट्रेट उभे करण्यात आले. संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री (Dr. Dinesh Gupta Anandshree) यांनी दोन दिवसांच्या परिश्रमातून ही कलाकृती साकारली.

Shiv Jayanti | राज्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक उपक्रम :

धाराशिव येथे तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत मानले जात असल्याने सिंहासन पूजन आणि शिवअभिषेक करण्यात आला. मंदिरात शिवभक्तांनी प्रदक्षिणा घालत जयघोष केला. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला.

सोलापुरातील मराठा वस्ती परिसरातील मंडळाने मागील सात वर्षांपासून डीजेमुक्त शिवजयंती साजरी करण्याची परंपरा जपली आहे. डीजेवर होणारा खर्च टाळून परिसरातील महिलांना साडी-चोळीचा मराठमोळा पोशाख भेट दिला जातो. मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे (Nitin Khilare) यांनी पाच बाय आठ फुटांचे भव्य चित्र रेखाटून महाराजांना अभिवादन केले. एखादा किल्ला जिंकल्यानंतर महाराज आणि मावळे त्या किल्ल्याची पाहणी करतानाचा क्षण त्यांनी आपल्या कॅन्वासवर जिवंत केला आहे.

News title : Shiv Jayanti Celebrations Across Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now