नाना पाटेकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार?

On: March 9, 2024 10:35 AM
Shirur Assembly Election
---Advertisement---

Shirur Assembly Election । आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहे. राज्यामध्ये काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. यापार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघातून (Shirur Assembly Election) नाना पाटेकर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सुप्रिया सुळे लढणार आहेत. तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्या भाऊजय सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही लोकसभा मतदारसंघामध्ये (Shirur Assembly Election) नेमकं कोण निवडणूक लढवणार याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा आहे. पण शिरूर, मावळ लोकसभामध्ये (Shirur Assembly Election) कोण उमेदवार असणार आहे. याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.

नाना पाटेकर लढणार?

अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून  (Shirur Assembly Election) अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये कोणता उमेदवार असणार याबाबत माहिती आता समोर आली आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने डंका वाजवला, अर्थातच अभिनेते नाना पाटेकर हे आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून नाना हे राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. आता पुन्हा त्या चर्चेला उधाण आलं आहे.

संजय शिरसाट यांची स्पष्टोक्ती

शिरूर लोकसभा मतदारसंघातून नाना पाटेकर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. यावर आता शिंदे गटाचे चर्चेत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की नाना आले पाहिजे त्यांचं स्वागत केलं पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले. याचा अर्थ नानांचं राजकारणात येण्यावर प्रश्नचिन्ह असल्याचं पाहायला मिळतंय.

मात्र शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधामध्ये कोण असेल हे सांगता येणार नाही. नाना पाटेकर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.

News Title – Shirur Assembly Election Nana Patekar News

महत्त्वाच्या बातम्या

खिशाला लागणार कात्री; ग्राहकांना मोठा शॉक

मराठा आरक्षणाबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी!

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून महत्त्वाची घोषणा

‘भाजपाकडून दोनदा निमंत्रण’, इंडिया आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

Join WhatsApp Group

Join Now