Dhangar Reservation | धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत याबद्दल माहिती दिली आहे. (Dhangar Reservation )
धनगर आणि धनगड एकच आहेत, असा स्वतंत्र जीआर राज्य सरकार लवकरच काढला जाणार आहे. हा जीआर कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकला पाहिजे, त्यासाठी जीआरचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी आणि सखल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाणार आहे.
धनगर-धनगड एकच, लवकरच जीआर काढणार
आता हीच समिती येत्या चार दिवसांत जीआरचा मसुदा तयार करेल. त्यानंतर राज्याचे महाधिवक्त्यांचे यावर मत घेतले जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील, असंही शिंदे म्हणाले. (Dhangar Reservation )
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल असेही, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय
कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावरच उत्पादन शुल्क मंत्री शुंभूराज देसाई यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “धनगर आणि धनगड एकच आहेत, असा स्वतंत्र जीआर सरकारनं काढावा, अशी मागणी धनगर समाजाची होती. तसा जीआर काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हा जीआर न्यायालयात टिकेल याची काळजी घेतली जाईल.”, असं शुंभूराज देसाई म्हणाले. (Dhangar Reservation )
News Title- Shinde govt Big decision on Dhangar Reservation
महत्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
महादेव आज ‘या’ राशींवर प्रसन्न होणार, वाचा सोमवारचे राशीभविष्य
राज्यात आज कुठं कुठं पाऊस पडणार?, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
आज ‘या’ 3 राशींना लाभणार सूर्यदेवाची कृपा, सर्व संकट होणार दूर!






