Share Market Fraud l सध्या शेअर बाजारातील विक्रमी तेजीमुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. मात्र आता शेअर बाजाराशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेअर बाजाराशी संबंधित अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आता NSE इंडियाने अशाच एका फसवणुकीबाबत गुंतवणूकदारांना सतर्क केले आहे.
शेअर मार्केटमध्ये फसवणुकीचा नवा प्रकार समोर :
राष्ट्रीय शेअर बाजार वेळोवेळी भांडवली बाजारातील व्यापाऱ्यांना अशा फसवणुकीबाबत सतर्क करत असते. देशातील मुख्य शेअर बाजार NSE ने फसवणुकीच्या प्रकरणांबाबत गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सावध केले आहे. NSE ने वारंवार व्यापारी आणि गुंतवणूकदारांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात न येण्यास सांगितले आहे.
बाजारात अशा काही संस्था आहेत त्या कधी कधी हमी परताव्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात, तर कधी इतरांची फसवणूक करतात. अशातच आता एक नवे प्रकरण समोर आले आहे. शेअर बाजार बंद झाल्यानंतर डिस्काउंटवर शेअर देण्याचे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. त्यामुळे यावर NSE ने गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Share Market Fraud l गुंतवणूकदारांनी या लोकांपासून सावध रहा :
NSE ने सांगितले की, JO HAMBRO नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. मार्केट बंद झाल्यानंतर कमी किमतीत शेअर्स दिले जातील, अशी फसवणूक ग्रुपमधील लोकांना केली जात आहे. हे सीट ट्रेडिंग अकाउंटच्या नावावर केले जात आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, NSE ने सांगितले की, या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून अनेक रिटेल गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही देखील सतर्क राहा.
याशिवाय Lazzard Asset Management India नावाची संस्था स्वतःला SEBI मध्ये नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर म्हणून दाखवत आहे. मात्र ते बनावट नोंदणी प्रमाणपत्र वापरत आहे. NSE ने सांगितले की Lazard Asset Management India या नावाने SEBI कडे नोंदणीकृत ब्रोकर नाही. लोकांनी त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.]
News Title : Share Market Discount Share Fraud News
महत्वाच्या बातम्या-
अजितदादांना मोठा झटका, कट्टर समर्थक शरद पवारांच्या गळाला?
सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
मोठी बातमी! अंबरनाथ MIDC कंपनीत गॅस गळती, केमिकल धूराने नागरिक त्रस्त
देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींच्या आर्थिक समस्या दूर होतील!
अजित पवारांचा सल्लाही फाट्यावर मारला, लेक थेट बापाविरूद्ध उभी ठाकणार






