नवरात्रीचे 9 दिवस ‘या’ 3 राशींसाठी ठरणार भाग्याचे!

On: September 25, 2024 11:23 AM
Shardiya Navratri 2024 this zodiac sign rich
---Advertisement---

Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रौत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून प्रारंभ होतो. यावर्षी 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीची आराधना केली जाते. नवरात्रीचे हे 9 दिवस काही राशीसाठी अत्यंत भाग्याचे ठरणार आहेत. या राशींवर देवी दुर्गेची कृपा राहील आणि त्यांचं भाग्य उजळेल. आता या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Shardiya Navratri 2024)

नवरात्रीत ‘या’ राशींवर राहणार देवीची कृपा

मेष रास : या राशीसाठी नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत शुभ ठरणार आहेत. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही गाडी किंवा घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. हा काळ गुंतवणूक करण्यासाठी अतिशय शुभ राहील. या काळात घरातील मुलं आनंदी राहतील. तुमचा नोकरीचा शोध या काळात पूर्ण होईल. देवी तुम्हाला भरभरून यश देईल. देवी तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस घेऊन येईल. (Shardiya Navratri 2024)

सिंह रास : नवरात्रीचे 9 दिवस या राशीसाठी अनुकूल असतील. राजकारणाशी संबंधित लोकांना काही अधिकृत पद मिळू शकतं. या काळात सिंह राशीच्या लोकांना इतरांकडून आदर मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखाने परिपूर्ण होईल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील, त्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल आणि प्रगतीही होईल.

धनू रास : तुमचे घर घ्यायचे स्वप्न नवरात्रीच्या काळात पूर्ण होईल. व्यवसायाशी संबंधित लोक उत्कृष्ट कामगिरी करतील, व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. महिला वर्गाला या काळात नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल. तुमच्या पगारात वाढ होईल. कोणत्याही कार्यात तुम्हाला नशीब साथ देईल. (Shardiya Navratri 2024)

News Title :  Shardiya Navratri 2024 this zodiac sign rich

महत्वाच्या बातम्या-

परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो व रेड अलर्ट जारी

ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशींचं नशीब फळफळणार, शनीदेव करणार धनवर्षाव

सोनं झालं महाग, भाव गेला 80 हजारांवर?; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

उर्मिला मातोंडकरचा संसार मोडणार, लग्नाच्या 8 वर्षांनी घेणार घटस्फोट?

अक्षय शिंदेच्या मृत्यूचं खरं कारण समोर, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Join WhatsApp Group

Join Now