Sharad Pawar | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (21 डिसेंबर) मस्साजोग गावी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी देखील संवाद साधला. ‘तुम्ही एकटे नाही, तुमच्या दुःखात आम्ही सगळे जण आहोत’, असं यावेळी पवार म्हणाले. यावेळी खासदार निलेश लंके , आमदार संदीप क्षीरसागर देखील उपस्थित होते.
संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देखमुख यांच्या शिक्षणाचा खर्च शरद पवार करणार आहेत. कुटुंबाला आर्थिक मदतीचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शरद पवार यांनी स्वतः कुटुंबाची भेट घेत सर्व अडचणी जाणून घेतल्या. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची जबाबदारी शरद पवार यांनी स्वीकारली. यावेळी वैभवी देखमुख यांनी सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी केली. (Sharad Pawar )
शरद पवार काय म्हणाले?
आमदार क्षीरसागर यांनी देखील यावेळी महत्वाची प्रतिक्रिया दिली. वाल्मीक कराडचे नाव घेत त्यांना अटक व्हावी, असं म्हटलं. वाल्मीक कराडनेच जिल्ह्याची वाट लावली, असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची मागणी पवारांकडे केली. तर, पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला, त्याबाबत खोटं सांगितलं. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा, जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे, त्यालाही अशीच शिक्षा झाली पाहिजे, असं संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे बोलून दाखवलं. (Sharad Pawar)
“जे घडले आहे त्याने सर्वसामान्य लोकांना धक्का बसलाय. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणार लोक इथे आहेत. अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणाला ही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली. जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना यांची हत्या झाली. हे चित्र अतिषय गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी.”, असं शरद पवार म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबररोजी अपहरण करण्यात आले, यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सरपंच हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी गावकऱ्यांकडून मोठं आंदोलन उभारण्यात आलं. हा मुद्दा आता राजकारणात देखील पेटला आहे. विरोधी गटाकडून या प्रकरणी महायुती सरकारवर हल्लाबोल केला जातोय. अशात आज शरद पवार (Sharad Pawar) बीड दौऱ्यावर येणार आहेत.
News Title – Sharad Pawar will help Santosh Deshmukh family financially
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्हाला न्याय हवाय”; देशमुख कुटुंबियांची शरद पवारांकडे मागणी
“वाल्मिक कराड कुठं आहेत? पत्ता देतो…”; धनंजय मुंडे काय म्हणाले?
लाडक्या बहीणींची संक्रांत होणार गोड, 2100 रुपये ‘या’ दिवशी मिळणार?
मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी महत्त्वाची व्यक्ती जेरबंद!
धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं; ‘या’ कारणामुळे मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?






