अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांनी बारामतीची सूत्रं पुन्हा हाती घेतली!

On: January 30, 2026 6:05 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार भावूक अवस्थेत असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं बारामतीकरांनी पाहिलं आहे. बारामती परिसरातून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) थेट नदीकाठी पोहोचले असून, त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करत परिस्थितीची माहिती घेतली आहे.

नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी :

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या नेतृत्वाबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवून स्वतः देशाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र आता परिस्थिती बदलल्याने शरद पवारांनी पुन्हा बारामतीची सूत्रं स्वतः हाती घेतल्याचं स्पष्ट होत आहे.

बारामती शेजारील नीरा वाघज गावात शरद पवारांनी नीरा नदीच्या प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली. नदीतील पाण्याची स्थिती, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे.

Sharad Pawar | बारामतीच्या राजकारणात पुन्हा सक्रिय :

एकीकडे अजित पवारांच्या (Ajit pawar) अस्थींचे विसर्जन सोनगाव येथे सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवार नीरा वाघजमध्ये पाहणीसाठी पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवारांनी बारामतीचं नेतृत्व करावं, तसेच पार्थ पवारांनी राज्यसभेत भूमिका घ्यावी, अशा चर्चाही सुरू असतानाच शरद पवार स्वतः मैदानात उतरल्याचं चित्र दिसत आहे.

या घडामोडींमुळे बारामती आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचं जुनं नातं पुन्हा अधोरेखित होत असून, आगामी काळात स्थानिक राजकारणात कोणती दिशा मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title: Sharad Pawar Returns to Active Baramati Politics After Ajit Pawar’s Death, Inspects Nira River

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now