Sharad Pawar | लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला आहे. महायुतीला मागे सारून महाविकास आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला तुतारी चिन्ह दिलं. तेव्हा मतदानावेळी इतर काही उमेदवारांना निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह दिलं होतं. त्याचा फटका हा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही भागात बसला असल्याचं दिसून आलं.
शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. तसेच त्यामध्ये चिन्हाबाबत महत्त्वाची टीप्पणी केली. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून काढून टाकावं. या चिन्हामुळे राष्ट्रवादीचं लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. नाहीतर न्यायालयात जाणार असल्याचं त्या पत्रात लिहिण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा याआधीच्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावरून निवडणूक लढवत होता. मात्र पक्षातील झालेल्या फूटीमुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रस शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिलं. त्या चिन्हावर निवडणूक लढवली गेली. मात्र पिपाणी या चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि तुतारीला पडणारी मतं ही पिपाणीला पडल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
“तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यामुळे साधर्म्य”
तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यामुळे साधर्म्य लक्षात येत नव्हते. यामुळे सामान्य लोकांना यातील फरक लक्षात येत नाही. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याचा कोणताही फटका बसू नये म्हणून आता स्वत: शरद पवारांनी (Sharad Pawar) निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाले. त्यावेळी अजित पवारांकडे 40 आमदार होते. त्यामुळे अजित पवारांकडे अधिक आमदार असल्याने निवडणूक आयोगाने अजित पवारांना घड्याळ चिन्ह आणि पक्ष दिला. तेव्हा शरद पवारांना निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं.
News Title – Sharad Pawar Letter To Election Commission About Pipani Symbol
महत्त्वाच्या बातम्या
“येत्या दोन दिवसांत राज्याला हादरवून सोडणारा खुलासा करणार”; बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
पुणे ड्रग्जच्या विळख्यात, सोशल मीडियावर ड्रग्ज तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल!
पुण्यात ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया






