राहुल गांधीही करणार विठू नामाचा गजर; शरद पवारांनी दिलं पंढरपूर वारीचं निमंत्रण

Pandharpur Wari | महाराष्ट्रात पंढरपूर वारीला अत्यंत महत्व आहे. राज्यभरातून भक्त, वारकरी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन विठ्ठूरायांचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी तृप्त होतात. यंदा 17 जुलै रोजी आषाढी आहे. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

याच पंढरपूर वारीत आता कॉँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. यावेळी पवारांनी वारीचे महत्व देखील राहुल गांधी यांना समजून सांगितले. शरद पवारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन राहुल गांधींना निमंत्रण दिलं आहे.

राहुल गांधी वारीत सहभागी होणार

याबाबत काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी माहिती दिली आहे. त्याप्रमाणे राहुल गांधी 14 तारखेला वारीत सहभागी होणार आहेत. “संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यात दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे दर्शन ते वारीत घेणार आहेत.”, असं संजय जगताप यांनी सांगितलं आहे.

मात्र, राहुल गांधींच्या वारीत सहभागी होण्यावर भाजपकडून (Pandharpur Wari ) जोरदार टीका केली जात आहे. आपल्या आक्रमक वक्तव्यांसाठी प्रचलित असणारे भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वारीत सहभागी होण्याचा निर्णयावर विरोध दर्शवला आहे.

तुषार भोसलेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

“हिंदुंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत येण्याचे निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवार यांना कोणी अधिकार दिला?”, असा सवालच तुषार भोसले यांनी केलाय. नेहमीच इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही वारीत यायला बघताय?, असा संताप तुषार भोसले यांनी व्यक्त केलाय.

एकंदरीत राहुल गांधी यांच्या वारीत सहभाग (Pandharpur Wari ) होण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच पेटले आहे. दरम्यान, वारीत शरद पवार देखील चालणार, अशा चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. यावर स्वत: शरद पवारांनी स्पष्टीकरण देत मी वारीत चालणार नसून केवळ पंढरपूरला जाणाऱ्या पालखीच्या स्वागतासाठी मी थांबणार असल्याचे सांगितले आहे.

News Title –  Sharad Pawar invited Rahul Gandhi to Pandharpur Wari

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; शिक्षण फक्त दहावी

गणेशोत्सवाला एसटीने कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये असताना सोनाक्षीच्या हनिमूनचे रोमँटिक फोटो व्हायरल!

जुलै महिन्यात लाँच होणार ‘या’ भन्नाट कार; पाहा यादी

सावधान! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी