शरद पवार यांच्या तब्येतीबाबत सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती!

On: February 10, 2026 1:12 PM
Supriya Sule
---Advertisement---

Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महत्त्वाची माहिती देत कार्यकर्ते आणि समर्थकांना दिलासा दिला आहे.

नेमका त्रास काय? :

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना खोकला, कफ आणि श्वास घेण्यास अडथळा जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्यांच्या छातीत संसर्ग (Chest Infection) झाल्याचे निदान झाले आहे.

Sharad Pawar | सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची पोस्ट :

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटलं की, “बाबांना छातीत संसर्ग झाला असून डॉक्टरांनी 5 दिवसांचा अँटीबायोटिक्स कोर्स पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. सुदैवाने इतर सर्व रिपोर्ट्स सामान्य आहेत. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.”

रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. अभिजित लोढा यांनी सांगितले की, शरद पवार (Sharad Pawar Health Update) यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ICU मध्ये ठेवण्याची गरज नाही. ते खासगी रूममध्ये उपचार घेत असून ऑक्सिजन लेव्हलसह सर्व पॅरामीटर्स सामान्य आहेत. ते सर्वांशी संवाद साधत आहेत.

डिस्चार्ज कधी मिळणार? :

सध्या अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू असून, उपचारांचा प्रतिसाद पाहून आणि अंतिम तपासणी अहवालानंतरच डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाईल. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

News Title: Sharad Pawar Health Update: Condition Stable

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now