रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य!

Sharad Pawar | भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दुसरा दिग्गज खेळाडू विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी सामन्यानंतर टी20 इंटरनॅशनलमधून निवृ्त्तीची घोषणा केली. त्यांच्या निवृत्तीच्या वृत्तावर काही क्रिकेट प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता दोघांच्या निवृत्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

योग्यवेळी निवृत्तीचा विचार करायला हवा. योग्यवेळी घेतलेली निवृत्ती योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत. ही गोष्ट चांगली आहे की, एका विशिष्ट काळानंतर आपला फॉर्म स्टॉप होऊ शकतो. त्याचवेळेला निवृत्तीचा निर्णय घेणं ती वेळ योग्य असते, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलंय.

योग्य निर्णय घेतला- शरद पवार

ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. आता सगळ्यांनी संधी मिळावी या हेतूने त्यांनी निवृत्ती घेतली. माझ्या मते त्यांनी योग्य निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे शरद पवार यांना उद्देशून राजकारणातून आता निवृत्त घ्यावी, असं म्हटलं होतं. पण दुसरीकडे शरद पवार निवृत्ती घेण्यास तयार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित शर्माने बारबाडोसच्या मैदानात रोवला भारताचा झेंडा; व्हिडोओ बघून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

‘अंपायरने गडबडीत चुकीचा निर्णय दिला’; आफ्रिका मीडियाचा मोठा दावा

पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर; अजित पवारांना धक्का

‘मी आरडाओरडा केला आणि काढ ती बंदूक म्हणाले…’; रुपाली ठोंबरेंसोबत घडला भयानक प्रकार

टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! T20 वर्ल्ड कपवर कोरलं नाव