“…मग शरद पवारांच्या पण कपाळावर गद्दार लिहिलंय का?”

On: December 3, 2022 6:03 PM
---Advertisement---

मुंबई | शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची अवस्था सध्या पिंजरे में पोपट बोले. या हिंदी गाण्यासारखी झाली आहे. 40 आमदारांच्या नावाने खडे फोडतात. कुडमुड्या ज्योतिष्यासमोर कार्ड ठेवलेले असतात, असं ते म्हणालेत.

संजय राऊतही रोज सकाळी उठतात. 40 कार्डपैकी काही कार्ड उचलतात आणि बोलायला सुरुवात करतात, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

अनेक नेत्यांनी पक्ष बदलले तसेच बंद केले याचेही दाखले नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. ते म्हणाले, मुळात गद्दार कोणाला म्हणतात काँग्रेसमधून शरद पवार साहेब बाजूला झाले, असंही ते म्हणालेत.

ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेला आहे, तुम्हाला दिसला असेल ते त्यांच्या बाजूला मग कसे बसतात?, असंही नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

ते काँग्रेसचे खासदार होते. काही लोक काही लोक घेऊन बाजूला झाले. मग शरद पवार साहेबांच्या पण कपाळावर गद्दर लिहिलय का?, असा प्रश्न देखील संजय राऊत यांना विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now