Shani Dev | शनीच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीवर होत असतो. शनीची वक्री, मार्गी, साडेसाती आणि ढैय्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. पंचांगानुसार, कर्मफळदाता शनी सध्या आपल्या स्वराशीत कुंभ राशीत विराजमान आहे. 30 जून 2024 ला शनीने याच राशीत वक्री चाल केली होती. तर, शनी मार्गीसुद्धा याच राशीत होणार आहे. (Shani Dev)
आज 11 सप्टेंबरपासून जवळपास दोन महिन्यांनी 15 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजून 39 मिनिटांनी शनी कुंभ राशीतून सरळ चाल चालणार आहेत. याचा 3 राशीवर परिणाम होणार आहे. आता या तीन राशी कोणत्या आणि त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात.
‘या’ राशींच्या जीवनात येईल सुखाचे दिवस
तूळ रास : तूळ रास ही शनीच्या प्रिय राशींपैकी एक आहे. जेव्हा शनीची दृष्टी आपल्या राशीत किंवा उच्च राशीवर पडते त्याचा सर्वात शुभ परिणाम तूळ राशीच्या लोकांना होतो. यावेळी शनीच्या मार्गी होण्याचा लाभ तूळ राशीच्या लोकांना होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना करिअरच्या बाबतीत अनेक संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी पगारही चांगला मिळेल.(Shani Dev)
मकर रास : या राशीच्या लोकांवर सर्वात जास्त शनीची कृपा असते. शनीच्या सरळ चालीने मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख-समृद्धी चालून येईल. यांचे आता चांगले दिवस सुरू होतील.जीवनात त्या सगळ्या गोष्टी मिळतील, ज्यासाठी तुम्ही कामना केली असेल.
कुंभ रास : या राशीवर शनी नेहमी प्रसन्न असतात. शनीचं मार्गी होणंसुद्धा या राशीच्या लोकांसाठी प्रचंड लाभदायक ठरतं.करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला नव्या संधी मिळतील. तुमचे भाग्य उजाळेल. या राशीच्या व्यक्तींना मान-सन्मान मिळेल. आर्थिक प्रगती होईल.(Shani Dev)
News Title : Shani Dev will grace this 3 sign
महत्वाच्या बातम्या-
लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये?, ‘या’ दिवशी येणार पैसे?
“भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर, मोदींनी देशाचं नेतृत्व योगींकडे द्यावं”
आज गौरी पूजन, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत
लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार, मिळणार अमाप पैसा!
मुलीच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे, ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय?






