हिटमॅनला ‘जाड्या’ म्हणणाऱ्या शमा मोहम्मद यांनी विजयानांतर ठोकला सलाम; पोस्ट चर्चेत

On: March 10, 2025 8:58 AM
Shama Mohamed Praises Rohit Sharma
---Advertisement---

Shama Mohamed | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) कौतुक करताना त्याच्या नेतृत्वाला सलाम केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी त्यांनी रोहितच्या फिटनेसबाबत आणि नेतृत्वाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यामुळे त्यांच्या या ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे.

शमा मोहम्मद यांचा रोहितविषयी बदललेला सूर

भारतीय संघाने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत करत पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयानंतर शमा मोहम्मद यांनी X वर पोस्ट करत लिहिले की , “चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्याबद्दल आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! शानदार 76 धावा करून विजयाचा पाया रचणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला सलाम. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनीही महत्त्वपूर्ण खेळी करून भारताला विजयाकडे नेले.”

मात्र, याआधी त्यांनी रोहितला “जाड्या शरीरयष्टीचा आणि सर्वात कमकुवत कर्णधार” असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता मात्र त्यांनी यूटर्न घेत हिटमॅनच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. (Shama Mohamed)

पंतप्रधान मोदींकडूनही भारतीय संघाचे कौतुक

भारताच्या या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही X वर पोस्ट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, “एक विलक्षण खेळ आणि एक विलक्षण निकाल! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी देशात आणल्याबद्दल आमच्या क्रिकेट संघाचा अभिमान आहे. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली. उत्कृष्ट कामगिरीसाठी आमच्या संघाचे अभिनंदन!”

भारताचा शानदार विजय

दरम्यान, दुबईतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य 49 षटकांत 6 विकेट्स राखून सहज पार केले. रोहित शर्माने 76 धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला, तर श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव 251 धावांवर रोखला.

भारतीय संघाच्या या शानदार विजयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण असून, हा विजय होळीपूर्वीच एक मोठा उत्सव ठरला आहे.

Title : Shama Mohamed Praises Rohit Sharma After Champions Trophy Win

 

Join WhatsApp Group

Join Now