साताऱ्यातील ‘या’ १६ गावांतून जातोय शक्तीपीठ महामार्ग! पाहा संपूर्ण यादी

On: April 15, 2026 1:41 PM
Shaktipeeth Highway
---Advertisement---

Shaktipeeth Highway | महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. सुधारित आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाने नव्या टप्प्यात प्रवेश केला असून, स्थानिक पातळीवरील बदलांमुळे अनेक गावांना थेट जोडणी मिळणार आहे.

सुधारित आराखड्यामुळे गावांचा समावेश वाढला :

सुरुवातीला या महामार्गाला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचा विरोध होता. जमिनींचे नुकसान, विस्थापनाची भीती आणि पर्यावरणीय परिणाम यांसारख्या मुद्द्यांवरून अनेक ठिकाणी आंदोलनं झाली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रकल्पात बदल करत सुधारित आराखडा तयार केला. त्यानुसार काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आणि नव्या गावांचा समावेश करण्यात आला. (satara villages list)

या नव्या आराखड्यानुसार सातारा जिल्ह्यातील माझणी, काकणकोळे, कासखांडी, आरगाववाडी, भुकेवाडी, धावकी, दिवाड, दोडवाववाडी, वरकुटे, तासवड (सिसवड शहराबाहेरून), भाटकी, खडकी, साळदारवाडी, कन्हेर, गारवाड आणि मगरवाडी या 16 गावांतून हा महामार्ग जाणार आहे. यामुळे या भागांना भविष्यात चांगली ओळख मिळण्यासोबतच विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Shaktipeeth Highway | तीर्थक्षेत्रांना जोडणी, प्रवास होणार सुलभ:

या महामार्गामुळे धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. सुधारित मार्गानुसार काही तीर्थक्षेत्रांचे अंतर वाढले असले तरी अनेक महत्त्वाची ठिकाणे महामार्गाजवळ आली आहेत. माहूरगड येथील रेणुकामाता मंदिर सुमारे 17 किमी, परळी वैजनाथ 11 किमी, तुळजाभवानी मंदिर 14 किमी आणि औंढा नागनाथ 14 किमी अंतरावर राहणार आहेत.

त्याचवेळी अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर, आदमापूर (Aadmapur) येथील बाळूमामा मंदिर आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) मधील पत्रादेवी ही ठिकाणे महामार्गाजवळ येत आहेत. याशिवाय नरसोबाची वाडी आणि जोतिबा या ठिकाणांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार असल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

News title : Shaktipeeth Highway Boosts Satara

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now