शाहरूखच्या पठाण चित्रपटानं दोन दिवसांत केली तब्बल ‘इतक्या’ रूपयांची कमाई

On: January 27, 2023 12:38 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान (Shah Rukh Khan)आणि दीपिका पादुकोणचा(Deepika Padukone) पठाण(Pathaan) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. परंतु या चित्रपटाचं जेव्हा ‘बेशरम’ हे गाणं रिलीज झालं तेव्हापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

या चित्रपटाला बाॅयकाॅटही करण्यात आलं. त्यामुळं हा चित्रपट बाॅक्स ऑफीसवर कमाई करू शकेल की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु सध्याची स्थिती पाहता चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला म्हणजेच २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज करण्यात आला. त्यातच गुरूवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यानं या चित्रपटानं दोन दिवसात भरपूर कमाई केली आहे.

पठाण चित्रपटानं दोन दिवसांत तब्बल १२३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं हा चित्रपट बाॅक्स ऑफीसवर सुपरहिट ठरेल हे तर निश्चित झालं आहे.

दरम्यान, काश्मिर खोऱ्यातील थिएटर्स ३२ वर्षांनी पठाण चित्रपटामुळं हाऊसफुल झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यातच आता शनिवार-रविवारची सुट्टी लक्षात घेता हा चित्रपट लवकरच २०० कोटीचा आकडा पार करू शकतो.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now