क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा गंभीर अपघात; गाडीही जळून खाक

On: December 30, 2022 12:20 PM
---Advertisement---

मुंबई | भारत क्रिकेट टीमचा(India Cricket Team) उत्तम खेळाडू ऋषभ पंत(Rishabh Pant) याच्या गाडीचा गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पंत दिल्लीहून घरी परत असताना हा अपघात झाला आहे.

रूरकीच्या नरसन सीमेजवळ हा अपघात झाला आहे. पंतवर सध्या डेहराडूनमधील मॅक्स हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंतला गंभीर दुखापत झाली आहे.

रूग्णालयातील डाॅक्टरांनी त्याला कपाळावर आणि पायावर दुखापत झाली आहे, अशी माहिती दिली आहे. तसेच पंतची प्लॅस्टिक सर्जरीही केली जाणार आहे.

पंतची कार रेलिंगला धडकली आहे. रेलिंगला कार धडकल्यानंतर कारनं पेट घेतला. गाडीला आग लागल्यानंतर मोठ्या मेहनतीनं पंतला बाहेर काढण्यात आलं. यावेळी पंत मर्सीडीज गाडीत प्रवास करत होता. पंतची ही गाडी जळून खाक झाली आहे.

पंतच्या अपघातानंतर क्रिकेट विश्वात दु:खाचे वातावरण तयार झाले आहे. तसेच त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

पंतच्या अपघाताची माहिती मिळताच त्याचे फॅन्सदेखील नाराज झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लवकर बरा व्हावा याची प्रार्थना चाहते करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Recent Comments

Join WhatsApp Group

Join Now