पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण; अल्पवयीन अग्रवालच्या ड्रायव्हरच्या जबाबाने खळबळ

On: May 30, 2024 11:38 AM
Pune News
---Advertisement---

Pune porsche accident | पुण्यातील हिट अँड रन केसमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांकडून अग्रवाल यांच्या चालकाची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याला अपघात (Pune Car Accident) नेमका कसा झाला, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात ड्रायव्हरने अत्यंत धक्कादायक दावा केलाय.

ड्रायव्हरच्या जबाबाने खळबळ

आपल्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची माहिती मिळताच विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला फोन केला होता. तू गाडी चालवत होतास असं पोलिसांना सांग. त्याबद्दल तुला बक्षीस देऊ, असं विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला सांगितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अपघात घडला तेव्हा पोर्शे कारचं स्टेअरिंग अल्पवयीन तरुणाच्या हातात होते. मी त्याच्या शेजारी बसलो होतो, अशी माहिती ड्रायव्हर गंगाराम पुजारी याने पोलीस अधिकाऱ्यांना दिली. आपला मुलगा पोर्शे कार चालवत आहे, ही गोष्ट विशाल अग्रवाल यांना माहिती होती. चालकाच्या या जबाबामुळे आता विशाल अग्रवाल यांचा मुलगा आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

“याप्रकरणात स्ट्राँग केस तयार करु”

अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अपघात प्रकरणाचा तपास योग्यरितीने सुरु असल्याचे सांगितले. आम्ही याप्रकरणात स्ट्राँग केस तयार करु, असा दावा त्यांनी केला.

अमितेश कुमार म्हणाले की “अपघात झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हर बदलल्याची बाबही समोर आली आहे. पुरावा नष्ट करण्याचा, त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रकार समोर आला आहे. ड्रायव्हर कार चालवत असल्याचा बनाव करण्यात आला होता.

पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अग्रवाल यांच्यावर कलम 201 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. सर्व गोष्टी आता सांगणं योग्य नाही. ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला होता, ही गोष्ट समोर आली आहे. कुणाच्या दबावाखाली बोलला आणि का बोलला याचा योग्यवेळी खुलासा करू”

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ऐश्वर्याने बच्चन कुटुंब सोडलं?’, ऐश्वर्याच्या नव्या पोस्टमुळे खळबळ

“तुला तंगडी सकट बाहेर ओढतो”; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा

पुणे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; गाडीत बसलेले वेदांतचे मित्र अडचणीत

आमदार सुनील टिंगरेंच्या भूमिकेबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळं सॉलव्ह होईल’; अग्रवालांच्या निकटवर्तीयांची अरेरावी 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now