Instagram Hack l आजकाल, इंटरनेटवर असणे ही प्रत्येकासाठी एक सामान्य गोष्ट झाली आहे आणि तुम्ही सर्वजण सोशल मीडिया ॲप्स वापरत असाल. आम्ही इंस्टाग्रामवर अनेक खास क्षण शेअर करतो. मात्र जर तुमचं अकाउंट हाक झालं तर तुमची चिंता वाढते. अशावेळी तुमचे खाते हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी काही खास सेटिंग्ज करणे फार महत्वाचे आहे.
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन :
तुमचे Instagram खाते सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करणे. हे तुमच्या खात्यात सुरक्षिततेसाठी आणखी एक स्टेप आहे. ज्यावेळी तुम्ही नवीन फोन किंवा कॉम्प्युटरवरून इंस्टाग्राम लॉगइन करता त्यावेळी तुमच्या मोबाइलवर एक OTP पाठवला जाईल, जो तुम्हाला टाकावा लागेल. मात्र ते सुरू करण्यासाठी दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
– सर्वात पहिल्यांदा तुमच्या प्रोफाईलवर जा आणि सेटिंगमध्ये जा.
– यानंतर सिक्युरिटीवर जा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशनवर क्लिक करा.
– येथे तुम्हाला एसएमएस किंवा ॲप निवडावे लागेल.
– नंतर येथे जा आणि लॉगिन ॲक्टिव्हिटी तपासा.
Instagram Hack l स्ट्रॉंग पासवर्ड वापरा :
तुमच्या खात्यात कोणीतरी केव्हा आणि कोणत्या डिव्हाइसवरून लॉग इन केले हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमची लॉगिन ॲक्टिव्हिटी पाहू शकता. यासाठी सेटिंग्जमध्ये सिक्युरिटीमध्ये जाऊन लॉगिन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करा. कोणतेही डिव्हाईस लॉग इन केव्हा झाले ते येथे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कोणतेही अनोळखी डिव्हाईस दिसल्यास ताबडतोब लॉगआउट करा.
पासवर्ड ठेवताना सर्वात अवघड पावर्ड ठेवावा. जो की कोणी सहज उघडू शकत नाही. पवर्ड ठेवताना त्यामध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष चिन्हे वापरून पासवर्ड टाकावा. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा आणि कोणालाही शेअर करू नका. याशिवाय तुमची प्रायव्हसी सेटिंग्ज वेळोवेळी तपासत राहा. तुमचा ईमेल आणि फोन नंबर बरोबर असल्याची आणि खात्याशी लिंक केलेली असल्याची खात्री करा. कोणतीही अज्ञात ॲक्टिव्हिटी आढळल्यास, आपण माहिती मिळवू शकता.
News Title : Secure Your Instagram Account
महत्त्वाच्या बातम्या-
माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? जाणून घ्या एका क्लिकवर
पाणीपुरीवर येणार बंदी; ‘या’ सर्वात मोठ्या आजाराचा धोका
सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होण्याची शक्यता