SBI ने ग्राहकांना दिली आनंदाची बातमी!

On: December 30, 2023 6:27 PM
SBI
---Advertisement---

मुंबई | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्वात जास्त व्याज देणाऱ्या अमृत कशाल या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख पुन्हा वाढवली आहे. अमृत ​​कलश एफडी ही 400 दिवसांची विशेष एफडी आहे, ज्यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दिले जात आहे.

FD गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आता गुंतवणूकदार 31 मार्च 2024 पर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. यापूर्वी, 31 डिसेंबर 2023 ही अमृत कलश एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत होती.

एसबीआयच्या वेबसाइटनुसार, अमृत कलश एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास मुदतीपूर्वी पैसे काढण्याची सुविधाही मिळते. मुदतीपूर्वी पैसे काढल्यास बँकेकडून 0.5 ते एक टक्क्यांपर्यंत दंड आकारला जातो.

SBI मधील FD व्याजदर

7 दिवस ते 45 दिवस 3.50%
46 दिवस ते 179 दिवस 4.75%
180 दिवस ते 210 दिवस 5.75%
211 दिवस ते 1 वर्ष कमी 6%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी 6.80%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी 7.00%
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी 6.75%
5 वर्षे आणि 10 वर्षांसाठी 6.50%

दरम्यान, SBI ने निवडक मुदतीच्या FD वरील व्याजदरात 0.50 टक्के वाढ केली आहे. याआधीही अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले ​​आहेत. यामध्ये कोटक महिंद्रा बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या नावांचा समावेश आहे. आरबीआयने डिसेंबरमध्ये जारी केलेल्या नवीन पतधोरणात रेपो दर 6.5 टक्के इतका कायम ठेवण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ram Mandir | ’22 जानेवारीला घराघरात…’; नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन

महत्त्वाची बातमी- 1 जानेवारीपासून तुमच्या Paytm-Gpayची UPI आयडी होऊ शकते बंद

Aishwarya Rai कडून सर्वात मोठा खुलासा, म्हणाली, “या कारणामुळे आमच्या दोघात मतभेद”

Team India: बायकांमुळे झाले बरबाद!, नाहीतर आज असते सचिन-कोहलीपेक्षा मोठे स्टार!

Pune Bus Accident | पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात बस उलटली, महत्त्वाची अपडेट हाती!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now