SBI Bank l सरकारी बँकांमध्ये पैसे ठेवण्यास नागरिक जास्त प्राधान्य देतात. अशातच सरकारची स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गोष्टी लाँच करत असते. अशातच आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI या सर्वाधिक मोठ्या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांच्या हितासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेनुसार एसबीआयच्या ग्राहकांना आता व्हाट्सअप बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
SBI बँकेने ग्राहकांना दिली गुड न्यूज :
देशभरातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था मानली जाते. मात्र जर तुमच खात एसबीआय बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आता व्हाट्सअप बँकिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
SBI च्या या सुविधेच्या माध्यमातून आता ग्राहकांना घरबसल्या कधीही आणि कुठूनही आपल्या व्हाट्सअपवरून विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा वापरता येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे एसबीआयच्या ग्राहकांना आता व्हाट्सअपवरून त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम देखील अगदी काही वेळातच तपासता येणार आहे.
SBI ने सादर केलेल्या सुविधेमध्ये ग्राहक मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप, कर्जाची माहिती, अकाउंट स्टेटमेंट, एनआरआय सेवा यासह बँकिंग संबंधित अन्य विविध प्रकारच्या सुविधा देखील वापरू शकतात. बँकेच्या या निर्णयामुळे बँक ग्राहकांना या सर्व सुविधा व्हाट्सअप वर मिळणार असल्याने त्यांचा बँकेत जाण्याचा वेळ देखील वाचणार आहे.
SBI Bank l सुविधेचा फायदा घेण्यासाठी ही प्रोसेस करा :
त्यामुळे ग्राहकांना छोट्या-मोठ्या बँकिंग कामासाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. मात्र ग्राहकांना या सुविधतेचा लाभ घेण्यासाठी +919022690226 हा मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये सेव करावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सॲपवरून Hii असा संदेश पाठवावा लागणार आहे.
मात्र जर ग्राहकांनी एसबीआयच्या व्हाट्सअप बँकिंगसाठी आधीच रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. एसबीआयच्या या सुविधतेचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
News Title : SBI bank account balance will be known on whatsapp
महत्वाच्या बातम्या-
LIC ची डिजी टर्म इन्शुरन्स योजना काय आहे? जाणून घ्या फायदे व पात्रता
स्टँडअप कॉमेडियन शो मधलं ‘ते’ वक्तव्य अन् आज मुनव्वरचा माफीनामा!
..अन् अमिताभ बच्चन यांनी थेट हाथच जोडले; नेमकं असं काय घडलं?
“.. म्हणून रेखा यांनी पुन्हा लग्न केलं नाही”; धक्कादायक खुलासा समोर
मोठी बातमी! सरकारने नगराध्यक्ष पदाचा कालावधी तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी वाढवला






