सतीश वाघ खून प्रकरणी पोलिसांना मिळाला मोठा पुरावा!

On: December 27, 2024 3:58 PM
Satish Wagh Murder
---Advertisement---

Satish Wagh Murder l पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 9 डिसेंबरला सतीश वाघ पहाटेच्या सुमारास चालण्यासाठी गेल्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. मात्र आता पुण्यात घडलेल्या सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत.

पत्नीनेच काढला पतीचा काटा :

सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ आणि मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांच्यात अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र काही दिवसानंतर ही बाब सतीश वाघ यांना समजली. त्यानंतर सतीश वाघ हे मोहिनी वाघ यांना सातत्याने मारहाण होते. मात्र त्यानंतर मोहिनी वाघने अक्षय जावळकरच्या मदतीने सतीश वाघ यांची हत्या करण्याचा कट रचला, आणि 9 डिसेंबरला त्यांची हत्या करण्यात आली.

मोहिनी वाघने अक्षय जावळकरला सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपये दिले होते. ही रक्कम अक्षय जावळकरने इतर आरोपींना दिली होती. पोलिसांनी मोहिनी वाघ यांना चौकशीवेळी काही प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यांचा गुन्हा कबुल केला आहे.

पोलिसांना मिळाला मोठा पुरावा :

याशिवाय सतीश वाघ यांच्यावर चाकूने तब्बल 72 वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आरोपींनी हत्या करून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकला होता. मात्र आता पोलिसांना तपासात आढळले की, आरोपींनी वापरलेली हत्यारे पेरणे फाटा येथे भीमा नदी पात्रात टाकलं आहे.

कारण या हत्येचा पोलिसांना सुगावा लागू नये, म्हणून आरोपींनी मृतदेहापासून अनेक किलोमीटर लांब नदीपात्रात ही हत्यारं टाकली असल्याची माहिती तपासादरम्यान मिळाली आहे. अशातच आता आरोपींच्या माध्यमातून हत्यारांचा शोध घेऊन ते जप्त केली जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती पोलिसांनी न्यायालयात देखील दिली आहे.

News Title : satish wagh murder update killer hide weapons in bhima river

महत्वाच्या बातम्या –

RJ सिमरनच्या आत्महत्येबाबत मोठी अपडेट समोर!

संतोष देशमुखांच्या आरोपींना अटक का नाही?; अजितदादांना राष्ट्रवादीच्याचं आमदाराचा सवाल

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला

पुण्यात ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला, कारण वाचून थक्क व्हालं

जानेवारीत तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार; पाहा सुट्ट्यांची यादी

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now