Satish Wagh Case | सतीश वाघ (Satish Wagh Murder) खून प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि मयत सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी हिने तपासादरम्यान एक खळबळजनक दावा केला आहे. तिने पती सतीश वाघ याच्यावरच गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, आता आणखी नवी माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये सतीश वाघ यांची हातपाय तोडायची सुपारी देण्यात आली होती. मात्र, त्यांची हत्या करण्यात आली.
…म्हणून सतीश वाघ यांची हत्या-
पुण्यातील सतीश वाघ (Satish Wagh Case) हत्याकांडात नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील ताज्या माहितीनुसार, सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने त्यांच्या पतीचा केवळ हातपाय तोडण्यासाठी सुपारी दिली होती, परंतु जेव्हा मारेकऱ्यांना हे कळालं की सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, तेव्हा त्यांनी हत्येचा निर्णय घेतला.
सतीश वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, मोहिनी वाघ हिने तिच्या प्रियकर अक्षय जवळकरसोबतच्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या सतीश वाघ यांचा केवळ हातपाय तोडण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती.
सहा जणांना अटक-
मारेकऱ्यांना जेव्हा कळलं की सतीश वाघ (Satish Wagh Case) हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात मोहिनी वाघ, पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव आणि अक्षय जवळकर यांचा समावेश आहे. हत्यारांनी आपले शस्त्र आणि इतर साक्षीदार वस्तू भीमा नदीत फेकल्याचं पोलिसांनी शोधलं आहे. या प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे जो हत्यारांच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरला जाईल.
सतीश वाघ यांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार, त्यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकले गेलं होतं. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि भयानक आहे ज्यामुळे समाजात खळबळ उडाली आहे.
News Title : Satish wagh case new revelations
महत्त्वाच्या बातम्या-
संतोष देशमुख हत्या प्रकरणी CID तपासात धक्कादायक माहिती समोर!
लाडकी बहिण योजना बंद होणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट!
होमिओपॅथी डॉक्टरांसाठी खूशखबर, अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासंदर्भात मोठा निर्णय
काय सांगता!, १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार?
वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती… आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची गरज नाही!






