खडसे निष्ठा सिद्ध करणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनचं आव्हान!

On: September 12, 2024 5:46 PM
Eknath Khadse
---Advertisement---

Eknath Khadse l विधानसभा निवडणूक जवळ येताच राजकारणातील समीकरण बदलताना दिसत आहेत. अशातच आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातच राहणार आहेत. मात्र आता एकनाथ खडसेंना त्यांच्याच पक्षातील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी निष्ठा सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीतूनच आव्हान :

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापुढे राष्ट्रवादी पक्षातही पुढील काळात आव्हान असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण भाजपने आपल्या प्रवेशाबाबत प्रतिसाद दिला नसल्याने एकनाथ खडसे यांनी आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटात राहून सक्रिय होऊन काम करणार असल्याचं म्हंटल आहे.

मात्र आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आक्षेप नोंदविला आहे. माजी मंत्री सतीश पाटील म्हणाले की, ज्यांना राष्ट्रवादी पक्षात यायचं त्यांना येऊ द्या, मात्र त्यांनी आपली निष्ठा सिद्ध करावी.

Eknath Khadse l एकनाथ खडसेंच्या निष्ठेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित :

मात्र आता ते सध्या कोणत्या पक्षात आहेत हे शरद पवार आणि दिग्गज नेते जयंत पाटील यांनी देखील सांगायला हवे. कारण अशा कार्यकर्त्यांमुळेच प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचं डॉ. सतीश पाटील म्हणाले आहेत.

याशिवाय एकनाथ खडसे ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेत आहेत. अगदी त्या पक्षातच त्यांच्या निष्ठेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असल्याने एकनाथ खडसे यांच्या पुढे राष्ट्रवादी पक्षात देखील आव्हान असल्याचे चित्र दिसून येत आहे.

News Title – satish patil challenged to eknath khadse

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गटात रोहित पवार बॅकफूटवर, ‘या’ गोष्टी नडल्या?

दुःखद बातमी! ज्येष्ठ नेते सिताराम येच्युरी यांचे निधन

मनोज जरांगेंचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर जोरदार हल्ला!

… तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा; ‘या’ नेत्याचं आवाहन

टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now