Maharashtra l पुण्यात गुन्हेगारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. शहरात कधी कोयता गॅंग, कधी महिलांवरील अत्याचार तर कधी खुणांच्या घटना वाढत आहेत. अशातच आता पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवार हल्लाबोल केला आहे.
राज्यात पहिल्यांदाच गृहमंत्रालय फेल गेलं :
पुण्यामध्ये घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. कारण पुण्यात राजरोसपणे खून होत आहेत, दोन दिवसांपूर्वी कोयता गँगने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच कायदा आणि सुव्यवस्थेचा ढासळली असून गृह मंत्रालय हे फेल गेलं असल्याची घणाघाती टीका माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
यावेळी सतेज पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं काम सध्या सुरू आहे. कारण सर्व इतिहासकारांनी त्यांचा इतिहास कच्चा असल्याचे सांगितलं आहे. इतिहासाचे भरपूर दाखले पाहिल्यानंतर खरा इतिहास लोकांसमोर आला आहे. त्यांना राज्याबद्दलचे इतकं प्रेम आहे की उद्योग घेऊन देखील ते जात आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलायचं काम हाती घेतलं असून हे सर्व महाराष्ट्राची जनता बघून घेत असल्याची सडकून टीका सतेज पाटील यांनी केली आहे.
Maharashtra l फक्त माफीने काहीही होणार नाही :
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणाबाबत फक्ततर माफी मागून चालणार नाही शिक्षा देखील झाली पाहिजे अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, कारण ज्या चुकीमुळे संपूर्ण जगभर नाचक्की झाली आहे त्यामुळे केवळ माफीने काहीही होणार नाही.
तसेच महायुती सरकार निवडणूक पुढे ढकलेल असं तर वाटत नाही. कारण निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा फायदा हा आम्हालाच होईल. तसेच महायुतीमधील जागावाटपाबाबत भांडण देखील आता समोर येत आहे. महाराष्ट्रातील सरकार हे जनतेला पटलेलं नसल्याचे सतेज पाटील म्हणाले आहेत.
News Title : Satej Patil On Devendra Fadanvis
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेच्या मुलाला फायदा होण्यासाठी… भाजप आमदाराकडूनच शिंदेंना तडाखे
मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही!; रवी राणांनी बावनकुळेंची ॲाफर धुडकावली
राज्यातील भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसेंची अवहेलना, मोठा निर्णय घेणार!
पुण्यात चाललंय तरी काय?, 12 तासात रंगला दुसऱ्या खुनाचा थरार
‘वनराज… तुला पोरं बोलवून ठोकतेच’; पोलिसांसमोर धमकी दिलेली ती कोण?






