Sara Ali Khan | बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही अनेक कारणांसाठी चर्चेत असते. तिचा स्वभाव, तिचे राहणीमान तिचा बेदरकारपणा या सर्व कारणांमुळे सध्या चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचे काही फोटो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. कधी मंदीर तर कधी मुस्लिम धर्मस्थळांना भेटी देताना दिसते. यावरून तिला अनेकदा चाहत्यांनी ट्रोल केलं आहे.
सारा अली खान (Sara Ali Khan) ही अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी आहे. सैफ हा मुस्लिम असून तिची आई ही हिंदू आहे. दरम्यान सारा आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जाते त्या ठिकाणी धार्मिक स्थळे असू शकतात. त्याठिकाणी ती अनेकदा देवाचं दर्शन घेतल्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करते. मात्र याकारणामुळे काही नेटकऱ्यांनी तिच्यावर संताप व्यक्त केला. यावर सारानेही (Sara Ali Khan) जशासं तसं उत्तर दिलं आहे.
काय म्हणाली सारा अली खान?
“धार्मिक विश्वासाबद्दल मला कोणी विचारलं तर मला त्याचा त्रास होणार नाही. कारण मी एक अशी व्यक्ती आहे की मी कोणासमोर कसं राहायचं हे मला सिद्ध करायची गरज नाही. मी इतरांसमोर कसं राहायचं? याबाबत खूपच विचार करायचे. पण आता नाही,” असं साराने (Sara Ali Khan) सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावलं आहे.
“माझा जन्म हा धर्मनिरपेक्ष कुटुंबात झाला”
“माझा जन्म हा धर्मनिरपेक्ष कुटुंबात झाला आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक, सार्वभौम देशामध्ये माझा जन्म झाला आहे. मला अन्यायाविरोधामध्ये बोलण्याची कधीच गरज भासली नाही. कारण विनाकारण बोलण्याची काही गरज नाही. याचा अर्थ असा नाही की जे चुकीचं आहे त्याविरोधात मी बोलणार नाही. काही लोकांना माझं काम आणि माझा अभिनय आवडत नाही, तर अशा लोकांच्या टीकांचा परिणाम होतो. मात्र माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत असाल तर त्याला बोलण्याचा अधिकार नाही”, असं सारा म्हणाली आहे.
View this post on Instagram
“यासाठी मी कधीच माफी मागणार नाही”
“माझा धार्मिक विश्वास, माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी, मी एअरपोर्टवर कशी जाते, हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. त्यासाठी मी कधीच माफी मागणार नाही,” असं सारा अली खान म्हणाली आहे. “जी लोकं मला जवळच्या मैत्रीणींसारख, माझ्या कुटुंबांसारखं ओळखत नाही, त्यांना माझं धार्मिक स्थळांना भेट देणं विचित्र वाटू शकतं. मी कशी आहे, माझा स्वभाव कसा आहे, हे माझ्या जवळच्या व्यक्तींना माहिती असतं,” असं सारा अली खान म्हणाली आहे.
View this post on Instagram
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर, अजमेर शरिफला सारा गेली होती, तेव्ही देखील काही चाहत्यांनी साराला ट्रोल केलं होतं, त्यावेळी लोकांना काय बोलायचं आहे ते बोलूदे, असं सारा म्हणाली.
News Title – Sara Ali Khan Aggressive On netizons About Her Religion
महत्त्वाच्या बातम्या
शहांसोबतच्या भेटीबाबत बाळा नांदगावकरांनी दिली महत्त्वाची माहिती!
अमोल कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?; दिलीप वळसेंच्या बंगल्यावर खलबतं
जावेद अख्तर यांचा पहिल्या लग्नाबाबत मोठा खुलासा!
अभिनेत्री समंथा प्रभूच्या ‘त्या’ वक्तव्याने सिनेसृष्टी हादरली, नेमकं काय घडलं?
महेंद्रसिंग धोनीने मारला आयकॉनिक ‘हेलिकॉप्टर शॉट’! व्हिडीओ व्हायरल






