Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. एवढंच नाही तर, बीड येथे आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी करत मोर्चा देखील काढला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे.
काय आहे प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनूसार, 20 दिवस उलटून सुद्धा संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्ये प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली नसल्यामुळे बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील आरोपींबाबत मोठा दावा केला आहे. दमानिया म्हणाल्या की, हत्ये प्रकरणातील 3 आरोपींचा खून करण्यात आला आहे.
काल रात्री (27 डिसेंबर) रोजी मला एख फोन आला, यावेळेस मला व्हाॅट्सअॅप काॅल करण्यास सांगितलं मात्र, मी काॅल केल्यावर काॅल लागला नाही, त्यामुळे मला व्हाॅट्सपअॅपवर व्हाईस मेसेज पाठवला. त्यामध्ये तुम्हाला संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्ये प्ररकरणातील 3 आरोपी सापडणारच नाहीत, त्यांचा मर्डर झाला असून याबद्दलची माहिती आम्ही एसपींकडे दिली आहे, अशी माहिती मला देण्यात आली, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
वाल्मिक कराड फरार-
वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत. दरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. काल(28 डिसेंबर) रोजी त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
News Title : Santosh deshmukh case anjali damaniya reveals the truth
महत्त्वाच्या बातम्या-
प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने मनसे नेता आक्रमक, सुरेश धसांना झापलं
दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!
पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा
क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दं






