“मतदारांना बाहेरून आणण्यासाठी ‘फोन पे’ करा”; शिंदेसेनेच्या आमदाराचं वक्तव्य

On: October 19, 2024 1:55 PM
Santosh Bangar controversial statement
---Advertisement---

Santosh Bangar | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढच्या महिन्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्त्यांची आता जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्ष आता प्रचाराला लागले आहेत. अशात शिंदे गटाच्या एका आमदाराचं एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. (Santosh Bangar )

यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी गाड्या करा, फोन पे करा..असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य

संतोष बांगर यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केल्याने, संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. यावर, निवडणूक आयोग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष राहील. (Santosh Bangar )

आमदार बांगर यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. अशात त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे. दरम्यान, उमेदवारी घोषित होण्याअगोदरच आमदार संतोष बागर यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. येत्या 24 तारखेला ते कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

2019 च्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी विजय मिळविला होता. 16 हजार 123 मतांनी ते विजयी झाले. आता त्यांनी पुन्हा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशात बांगर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. (Santosh Bangar )

News Title –  Santosh Bangar controversial statement

महत्त्वाच्या बातम्या-

निवडणुकीआधी गिरीश महाजन संकटात; महिला पोलीस अधिकाऱ्याचे अत्यंत गंभीर आरोप

ठाकरे गटाची संभाव्य उमेदवार यादी जाहीर! पाहा यादी एका क्लिकवर

ठाकरे गटाची संभाव्य उमेदवार यादी समोर; पाहा कुणा-कुणाला मिळाली संधी?

शिंदे सेनेतील ‘या’ दोन बड्या नेत्यांविरोधात उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!

अजित पवार गटातून कोण कुठं लढणार? संभाव्य उमदेवार यादी समोर

Join WhatsApp Group

Join Now