रियान पराग RR चा नवा कर्णधार, संजू सॅमसन अनमोल सल्ले देत म्हणाला…

On: March 21, 2025 11:17 AM
Sanju Samson Supports Riyan Parag
---Advertisement---

Sanju Samson | आयपीएल 2025 हंगामाच्या तोंडावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघात मोठे बदल झाले आहे. संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे रियान पराग (Riyan Parag) याच्याकडे पुढील तीन सामन्यांसाठी नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. यावेळी संजूने स्वतः व्हिडीओद्वारे सहकाऱ्यांसमोर रियानच्या कर्णधारपदाची घोषणा केली आणि भावनिक आवाहन केलं.

“रियानला साथ द्या” – संजू सॅमसनचं सहकाऱ्यांना आवाहन

राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये संजू म्हणतो, “मी पुढील तीन सामन्यांसाठी पूर्णपणे फिट नाही. पण आमच्या संघात उत्तम नेतृत्व तयार झालं आहे. रियानकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मला खात्री आहे की तो ही जबाबदारी समर्थपणे पार पाडेल. त्याला पाठिंबा द्या, त्याच्यासोबत उभं राहा.”

संजू सॅमसन सध्या इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात खेळणार आहे. मात्र, विकेटकीपिंगबाबत (wicketkeeping) अद्याप BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्स कडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे तो फक्त फलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे.

बोटाच्या दुखापतीमुळे संजू बाहेर

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान संजूच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. या दुखापतीमुळे तो सध्या विकेटकीपिंगसाठी तंदुरुस्त नाही. त्यामुळे संघाने तात्पुरते नेतृत्व रियान परागकडे सोपवले आहे. (Sanju Samson)

राजस्थानचा आगामी सामना 

23 मार्च: सनरायझर्स हैदराबाद
26 मार्च: कोलकाता नाईट रायडर्स (गतविजेता)
30 मार्च: चेन्नई सुपर किंग्स

या तिन्ही सामन्यांत रियान पराग कर्णधारपदाची धुरा वाहणार आहे. संघात त्याचं पहिल्यांदाच कर्णधार म्हणून पदार्पण होत आहे, त्यामुळे त्याची कामगिरी पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Title : Sanju Samson Supports Riyan Parag as RR Captain 

 

Join WhatsApp Group

Join Now