‘…तर पूर्ण नागडा करीन’; संजय राऊतांचा राणेंना इशारा

On: January 6, 2023 3:25 PM
---Advertisement---

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) निशाणा साधला आहे. माझ्या नादाला लागू नका, असा इशारा संजय राऊतांनी नारायण राणेंना दिलाय.

नारायण राणे यांच्या आरोपावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे झाला का? धमक्यांना मी घाबरत नाही, राजवस्र बाहेर काढून या, असं राऊत म्हणालेत.

नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना आता मी नागडाच करतो. त्यांची सगळी प्रकरणं उद्या बाहेर काढतो, असं वक्तव्य करत संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द वापरले. 

कालपर्यंत मी त्याला आदरार्थी संबोधत होतो. पण त्याने आरेतुरेची भाषा वापरली.  सगळ्यांना आरे तुरे करतो. मुख्यमंत्र्यांना आरेतुरे… मोदींना आरेतुरे.. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, फडणवीस, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांना आरे तुरे करतो, असं राऊत म्हणालेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंवर जे आरोप केले, ते उत्तर दिले का? 100 बोगस कंपन्या आणि इतर सगळी प्रकरणं बाहेर काढतो, असा इशारा राऊतांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now