“फडणवीस राजकारणातील कच्च मडकं, त्यांना..”; संजय राऊतांची खोचक टीका

On: May 12, 2024 1:52 PM
Sanjay Raut
---Advertisement---

Sanjay Raut | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे. राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर टीका केली.

“आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत नाहीत. अशी स्वप्न फक्त देवेंद्र फडणवीस यांना पडतात. त्यांना सत्तेचा आजार झाला होता. फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. फडणवीस हे राजकारणातील कच्च मडकं आहेत.”, अशी टीका संजय राऊत यांनी केलीये.

“कॉपी करून पास होणाऱ्या लोकांसारखे फडणवीस..”

फडणवीस हे कॉपी करून पास होणाऱ्या लोकांसारखे आहेत. आम्ही नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आणि हरलो.हे फडणवीस यांना माहीत नसेल. कारण, तेव्हा ते राजकारणात फार नव्हते, असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टार्गेट केलं. “एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वत:चं असं काहीच नाही. लोकं त्यांना मतं देणार नाहीत. महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकत आहे. अजित पवार गट एकही जागा जिंकणार नाही. शिंदे गटालाही एकही जागा मिळणार नाही.”, असा दावा राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे.

“…पूर्वीच मोदींना सत्तेतून पायउतार व्हावं लागेल”

तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की,”आता अजित पवार मोकळे झाले आहेत. त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या आहेत. सध्या मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे. त्यांची अखेरची तडफड सुरूये. त्यांचं बॅलन्स शिल्लक नाही. डिपॉझिट जाईल.”, अशी टीका राऊत यांनी शिंदे यांच्यावर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल देखील राऊत यांनी एक दावा केलाय. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मोदींना 75 वर्ष होत आहेत. 75 वर्षावरील नेत्यांनी संसदीय राजकारणात राहायचं नाही, असा नियम त्यांनीच केलाय. पण त्याआधीच 4 जून रोजी मोदींना सत्तेतून पायउतार व्हावं लागेल, असं संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.

News Title- Sanjay Raut targets Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या-

कॉउंटडाउन सुरु! दहावी, बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल

आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

कार घेयचा विचार करताय? तर या आहेत टॉप-5 हॅचबॅक कार

शेतकऱ्यांची चिंता वाढली; अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार

मदर्स डे स्पेशल पाहा हे थ्रिलर चित्रपट; अंगावर येईल काटा

Join WhatsApp Group

Join Now