Sanjay Raut | अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण संबंधी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना चर्चेसाठी राजी केलं. तेव्हापासून ते अधिकच चर्चेत आहेत. अगोदर त्यांनी पवारांवर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी थेट सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
त्यानंतर काल 17 जुलैरोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडका भाऊ योजने’ची घोषणा केली. त्यामुळे राज्यभरात सध्या ही योजना आणि मराठा आरक्षण प्रश्न गाजत आहे. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
तसंच बहीण ही घर चालवत असते. त्यामुळे दीड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत. स्त्री पुरूष समानता असायला हवी. तसेच परवा सगळे लाडके भाऊ भरतीकरता जमा झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी, असा टोला देखील राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
“छगन भुजबळ मोठे कलाकार, त्यांनी..”
पुढे त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. येत्या काळात कळेलच पवार साहेब काय आहेत, असं म्हणत त्यांनी पुढे भुजबळ यांना टार्गेट केलं. छगन भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी सिनेमातही कामं केलंय, ते नाट्य देखील निर्माण करतात. भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहेत, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर ठाकरे गट आता विधानसभासाठी तयारीला लागला आहे. ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
News Title – Sanjay Raut target Chhagan Bhujbal
महत्त्वाच्या बातम्या-
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर; अभिषेकच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांनाच धक्का
आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता!
भाजप नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राजकारण पेटलं
मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे?, हवामान विभागाचा मोठा इशारा
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक, पालकांनो आपल्या मुलांचं ‘असं’ करा संरक्षण!






