Sanjay Raut | लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. यामध्ये खासदार व अभिनेत्री कंगना रनौतने देखील खासदारकीची शपथ घेतली. यानंतर कंगनाने दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाला भेट दिली. मात्र, ही भेट आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
कंगनाने थेट महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूट (प्रशस्त खोली) मागितला आहे. यामुळे याची एकच चर्चा रंगली आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंगनाच्या या मागणीला मूर्खपणा असं म्हटलं आहे.
कंगनाने मागितली थेट मुख्यमंत्र्यांची खोली?
“कंगना रनौत इतक्या मोठ्या आहेत त्यांना राष्ट्रपती भवानातच ठेवयाला हवं.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. नवीन खासदार जेव्हा दिल्लीत निवडून जातात, तेव्हा ते ज्या राज्यातून निवडून जातात, त्याच राज्याच्या सदनात राहण्याची व्यवस्था केली जाते. कालच मी आमच्या खासदारांची चौकशी केली. ते महाराष्ट्र सदनात आहेत. त्यांना सिंगल रुम मिळाली आहे. कंगना रनौत नावाच्या श्रीमती आहेत, त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांचा सूट मागावा हा विनोद आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली.
संजय राऊत यांची टीका
“कंगना हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांना हिमाचल सदनमध्ये ठेवावं. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना त्यांचा सूट द्यावा.”, असा खोचक टोला यावेळी राऊत (Sanjay Raut ) यांनी लगावला.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे सर्व खासदार हे सध्या दिल्लीत असून या खासदारांच्या राहण्याची सोय विविध राज्यांच्या सदन व भवनांमध्ये करण्यात आली आहे. अशातच खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना महाराष्ट्र सदनात दाखल झाली होती. यावेळी कंगनाने तिथे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याच सुटची मागणी केली, अशी चर्चा होऊ लागली.
यावरून आता विरोधक कंगनावर निशाणा साधत आहेत. “हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी.”, असं ट्वीट करत राऊत यांनी कंगनाला टोला लगावला आहे.
News Title – Sanjay Raut Targate Kangana Ranaut
महत्त्वाच्या बातम्या
राहुल गांधी एनडीएला पाठिंबा देणार? मात्र घातली ‘ही’ अट
पोर्शे कार अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय!
सावधान! राज्यात फोफावतोय ‘हा’ संसर्गजन्य आजार; वेळीच काळजी घ्या
टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, 595 दिवसांनंतर रोहितसेना इंग्लंडचा बदल घेण्यास सज्ज
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय! महायुतीला धक्का बसणार?






