Sanjay Raut | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. भोंगा वाजवणाऱ्या काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. यावर आज (24 जून) राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
यावेळी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील निशाणा साधला. “त्यांना टीका करू द्या, सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य ,बेकायदेशीर आहेत. हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे, तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राच्या बोकांडी मोदी आणि शाहांनी बसवलंय.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“लोकसभा निवडणुकीत महायुतीला आम्ही सर्वांनी मिळून जो बांबू घातलाय, तो अजून निघालेला नाही. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय.”, असा टोला देखील यावेळी राऊत यांनी लगावला.
पुढे संजय राऊत म्हणाले की, “आगामी विधासभेच्या निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या आणि याच बांबूचे फटके सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील. त्यांना आता बांबूची आठवण झाली आहे. लोकसभेला लागलेला बांबू कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की कसा हा प्रश्न त्यांना पडला आहे.”, अशी टीका राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
आजपासून 18 व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केलं. “लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्र आवाज उठवू. संसदेत आता नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा आवाज चालणार नाही तर इंडियाच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार”, असा इशाराच राऊत यांनी दिलाय.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?
बांबू संवर्धनाविषयीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. “बांबू एक महत्त्वाचा वृक्ष आहे. बांबूचे अनेक बाय प्रोडक्ट आहेत. त्यामुळे बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. याशिवाय, काही लोकांना बांबू लावला पाहिजे. काही असे लोक आहेत जे सकाळी-सकाळी भोंगा वाजवतात.”, असं म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला होता.
News Title – Sanjay Raut Slammed Cm Eknath Shinde
महत्त्वाच्या बातम्या
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; 1 जुलैपासून होणार मोठा बदल
लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; कोणते मुद्दे गाजणार?
सोनाक्षी-झहीरने ग्रँड रिसेप्शन पार्टीत केला रोमँटिक डान्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
…तर रोहितसेना ऑस्ट्रेलियाचा वचपा काढणार? कांगारूंना दाखवणार घरचा रस्ता
विधानसभा निवडणुकीत भाजप किती जागा लढवणार? जाणून घ्या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला






