“नेहरू कधी गटारातून गॅस काढून चहा बनवा म्हणाले नाही”

On: September 21, 2023 1:31 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेत खणखणीत भाषण केलं. या भाषणात त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर तोफ डागली. सध्या संजय राऊतांचं हे राज्यसभेतलं भाषण चर्चेत आलं आहे.

‘भारताचा गौरवशाली अंतराळ प्रवास’ या विषयावरील चर्चत संजय राऊत सहभागी झाले. यावर बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. यावेळी राऊतांनी मोदींवर अत्यंत खोचक शब्दात टीका केली.

पंडित नेहरूंच्या काळातही खूप साऱ्या नाल्या आणि गटारं होती. पण, पंडित नेहरू असं म्हणाले नाही की, गटारातून गॅस काढून चहा बनवा. हे सुद्धा विज्ञान आहे. गटारातून गॅस काढू शकतो, हे विज्ञान आहे पण, पंडित नेहरूंचा विचार वरचा होता. पंडित नेहरूंनी इस्रो बनवलं, असं सांगत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.

2014 आधीही या देशात खूप सारं काम झालं आहे. त्यामुळेच आज चांद्रयान वरती गेलं आहे. पंतप्रधानांचे आपापले विचार असतात. काही विज्ञानवादी असतात. काही अंधश्रद्धावादी असतात. काही अंधभक्त असतात. काही भक्त असतात, असं म्हणत राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केलाय.

भारताचा अंतराळ प्रवास खूपच गौरवशाली आहे. सरकारं येतात आणि जातात. पंतप्रधानही आले आणि गेले. पण, भारताचा अंतराळ प्रवास निरंतर चालू आहे. हा पंडित नेहरू विरुद्ध नरेंद्र मोदी असा वाद व्हायला नको. तुम्ही तिकडून मोदी मोदी म्हणणार आणि आम्ही नेहरू नेहरू म्हणणार. हे टीम वर्क आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now