“आमदारांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवा, मंत्रीमंडळ विस्तारात…”; संजय राऊतांनी डिवचलं

On: December 13, 2024 12:50 PM
Sanjay Raut reacts on cabinet expansion
---Advertisement---

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांचे लक्ष हे आता मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागले आहे. उद्या 14 डिसेंबररोजी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही खातेवाटप जाहीर झालेलं नाही. फडणवीस सरकारमध्ये कुणाला संधी मिळणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यातच शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक आमदारांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केल्याचं चित्र आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी होऊन आठवडा पूर्ण झाला आहे. मात्र, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी टोलेबाजी केली. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी आमदारांना खोचक शब्दात डिवचलं.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“एकनाथ शिंदे यांच्या नाराजीला आता कुणी विचारत नाही. त्यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. हे सगळे कळसूत्री बाहुली आहेत. हे सर्व गुलाम आहेत. गुलामांना बंडाची भाषा शोभत नाही. त्यांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे.काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या बदल्यात हृदयविकाराचा झटका आला नाही म्हणजे झाले. पण त्यांच्यासाठी रुग्ण वाहिका ठेवल्या पाहिजेत”, असा खोचक टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

पुढे त्यांनी म्हटले की, “आम्ही तुरुंगवास भोगले. रक्त सांडले. आम्हाला पुन्हा आवाहन देऊ नका. मुंबईसाठी 105 हुतात्मे द्यायची तयारी उद्धव साहेबांची आहे. तेव्हा पहिला हुतात्मा मी असेल.” यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत देखील भाष्य केलं. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेलेल्या नाहीत. आम्ही कोणताही निर्णय घेताना तीन पक्ष एकत्र बसून घेतो. तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असं राऊत यांनी सांगितलं.

“…तर ती महाराष्ट्राशी बेईमानी होईल”

यावेळी त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरही प्रतिक्रिया दिली. “अजित पवार यांना अद्याप केंद्रात मंत्रिपद मिळालेले नाही. केंद्रात मंत्रिपद हवे असल्यास सहा खासदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे, शरद पवार गटाचे पाच खासदार फोडून घेऊन या, असे प्रफुल पटेल यांना सांगण्यात आलेले आहे. तेव्हा तुमचा सहा खासदारांचा कोटा पूर्ण होईल आणि तुम्हाला मंत्रिपद देण्यात येईल. आता जे कुणी फुटणार असतील त्या फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे”, असं राऊत म्हणाले.

शरद पवार यांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार हे लोक फोडू पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर शरद पवार एक मोठे नेते आहेत. जर कुणी त्यांच्याशी बेईमानी केली तर ती महाराष्ट्राशी बेईमानी केल्यासारखे होईल, असंही पुढे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

News Title –  Sanjay Raut reacts on cabinet expansion

महत्वाच्या बातम्या :

वर्ल्ड चॅम्पियन गुकेशची नेटवर्थ किती?, आकडा ऐकून चकित व्हाल

दत्त जयंती 14 की 15 डिसेंबरला; जाणून घ्या नेमकी कधी?

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?, दिल्लीत भाजप व शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्यांची गुप्त भेट

काळजी घ्या! राज्यात ‘या’ तारखेपासून गारठा वाढणार?

गेल्यावर्षी 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळणारं सोनं आज पोहोचलं ‘इतक्या’ हजारांवर!

Join WhatsApp Group

Join Now