“RSS नं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही”

Sanjay Raut | लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे पारचा नारा दिला होता. पण, भाजपला फक्त 240 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या या पराभवानंतर RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेसक संघाने अजित पवार गटावर निशाणा साधला होता. बीजेपीने अजित पवार गटाला सोबत घेतलं, याचा परिणाम निकालावर झाला असल्याचं आरएसएसने म्हटलं आहे.

दुसरीकडे मागेच भाजपचे नेते जेपी नड्डा यांनी भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा विरोधकांनी यावरून बरीच टीका केली होती.अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरएसएसबद्दल एक मोठा दावा केला आहे.

संघानं (RSS) ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. आम्हाला आरएसएसबद्दल खूप अपेक्षा आहेत. लोकतंत्र वाचविण्यासाठी संघाचं मोठं योगदान आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“मी आरएसएसबद्दल खूप ऐकतोय. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही असंच म्हटलं की, लोकसेवकला अहंकार नसला पाहिजे. पण गेल्या दहा वर्षांत देशात केवळ अंहकारच पाहिला गेला आहे. अहंकार आहे, इर्शा आहे, बदल्याची भावना आहे. सत्तेचा गैरवापरही पाहिलाय. अहंकाराच्या राजकारणाला जनतेनं रोखलं.जिथे जिथे रामाचं वास्तव्य होतं, तिथं तिथं भाजपचा पराभव झाला. भाजपची मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहेत. लोकतंत्र वाचविण्यासाठी RSS चं मोठं योगदान आहे.”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

तसंच पुढे ते म्हणाले की, “रावण गर्विष्ठ होता. म्हणून प्रभू रामाने त्याचा वध केला. आज तोच अहंकार रामाच्या नावाने चालत होता. तो जनतेने बंद केला आहे. मात्र, याचा पूर्णतः पराभव झालेला नाहीये. ते काम आता आरएसएसला (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) करावे लागेल.”, असं आवाहन देखील राऊत यांनी केलंय.

“..हे काम आरएसएसला करावे लागेल”

यावेळी राऊत यांनी एक उदाहरण देखील दिलं. जेव्हा 1975 साली आणीबाणी घोषित झाली, तेव्हा तत्कालीन सरसंघचलाकांनी त्या आणीबाणीचा विरोध केला होता. या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघाच्या काही लोकांनी अमूल्य योगदान दिलं आहे. त्यासाठी ते तुरूंगातही गेले. मात्र, गेल्या 10 वर्षांत अतिशय विरुद्ध परिस्थिती पहायला मिळाली. मात्र अहंकाराचे हे राजकारण जनतेने रोखलं आहे. येत्या काळात आरएसएसची भूमिका राहील आणि सत्तेवर जे अहंकारी नेते बसले आहेत, त्यांना तुम्ही लवकरच सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न कराल. असा विश्वास देखील राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे.

News Title – Sanjay Raut on RSS

महत्त्वाच्या बातम्या-

मुकेश अंबानी देशवासीयांना देणार मोठं गिफ्ट, आता 4G-5G इंटरनेट नाही तर थेट..

कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीवर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

“विधानसभेपूर्वी पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करा,अन्यथा..”; बीडमधील बॅनरने राजकारण तापलं

कंगनाला मिळणार ‘या’ सुखसुविधा, खासदार झाल्यानंतर बदललं आयुष्य

रोज सेक्स करणं चांगलं आहे का?, तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती