Sanjay Raut on Congress l विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यातील नेतेमंडळी मुख्यमंत्री पदावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतून एक मोठी घडामोड समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केलं आहे.
काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष मुख्यमंत्री पदासाठीच दावेदार असल्याचं सांगत आहेत. मात्र यावेळी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, कारण अजून जागावाटप बाकी आहे.
तसेच लोकसभेला आमच्यामुळं काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. याशिवाय काँग्रेसचे वरीष्ठ नेते देखील असा काही निर्णय घेणार नाहीत. तसेच सर्व लहान मित्र पक्षांनाही यामध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
Sanjay Raut on Congress l आज माविआची जागावाटपासंदर्भात बैठक होणार :
आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच महाविकास आघाडीकडून संधी दिली जाणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहे. तसेच काही मतभेद झालेच तर पुन्हा वरिष्ठ नेते एकत्र बसून बैठक घेतील असंही राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील संजय राऊतांना विचारण्यात आलं आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं ते म्हणाले आहेत.
News Title : Sanjay Raut on Congress
महत्वाच्या बातम्या –
सरकारचा मोठा निर्णय! वीज दर ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार
मोठी बातमी! भाईजानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या फोटोने खळबळ
ठाकरे की शिंदे?, यंदा शिवाजी पार्कवर कोण गाजवणार दसरा मेळावा?
सोनं स्वस्त झालं की महाग?, सराफा बाजारात काय आहेत सध्या दर?
वृषभसह आज ‘या’ 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनलाभाचे संकेत






