संजय दत्तच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर! नवीन वर्षातच जवळची व्यक्ती हरपली

On: January 8, 2026 4:46 PM
Shukla Kumar Death
---Advertisement---

Shukla Kumar Death | नवीन वर्षाची सुरुवात होत असतानाच बॉलिवूडमधून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेते दिवंगत राजेंद्र कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेते कुमार गौरव यांच्या आई शुक्ला कुमार यांचं निधन झालं आहे. शुक्ला कुमार या अभिनेता संजय दत्त यांच्या नात्यातील अत्यंत जवळच्या सदस्य होत्या. कुमार गौरव यांनी संजय दत्त यांची सख्खी बहीण नम्रता दत्तशी विवाह केला असल्याने, शुक्ला कुमार यांचं निधन संजय दत्त कुटुंबासाठी मोठा आघात मानला जात आहे.

शुक्ला कुमार या नेहमीच प्रकाशझोतात राहणं टाळत असत. त्या लाइमलाइटपासून दूर राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि जवळच्या व्यक्तींकडून दुःख व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कुटुंबीयांकडून 10 जानेवारी रोजी शोकसभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Rajendra Kumar wife death)

राजेंद्र कुमार यांच्या कारकिर्दीत शुक्ला कुमार यांची महत्त्वाची भूमिका :

शुक्ला कुमार (Shukla Kumar death) यांचे पती आणि बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते राजेंद्र कुमार यांचं निधन 12 जुलै 1991 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ‘ज्युबिली कुमार’ म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र कुमार बॉक्स ऑफिसवर सलग यशस्वी चित्रपट देण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत शुक्ला कुमार यांनी सावलीसारखी साथ दिली होती.

राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) यांच्या करिअरमधील प्रत्येक चढ-उतारात शुक्ला कुमार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, यश, अपयश आणि संघर्ष जवळून पाहिले. मात्र, कधीही स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. कुटुंब हीच त्यांची खरी ओळख होती.

Shukla Kumar Death | बॉलिवूडशी घट्ट नातं; मोठा कौटुंबिक वारसा :

शुक्ला कुमार या हिंदी सिनेसृष्टीतील रमेश बहल आणि श्याम बहल यांच्या बहीण होत्या. त्यामुळे गोल्डी बहल आणि रवी बहल यांच्याशीही त्यांचं जवळचं नातं होतं. अशा प्रकारे त्यांचा परिवार संपूर्ण बॉलिवूडशी जोडलेला होता. राजेंद्र कुमार आणि शुक्ला कुमार यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

त्यांचा मुलगा कुमार गौरव (Kumar Gaurav) यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी अभिनेता संजय दत्त यांची बहीण नम्रता दत्तशी विवाह केला होता. मुलगी डिंपल यांचा विवाह हॉलिवूड चित्रपट निर्माते राजू पटेल यांच्याशी झाला आहे, तर दुसरी मुलगी मनोरमा यांचं लग्न निर्माते ओ. पी. रहलान यांच्याशी झालं आहे. या कुटुंबाचा वारसा केवळ अभिनयापुरता मर्यादित नसून चित्रपटसृष्टीच्या विविध क्षेत्रांपर्यंत पसरलेला आहे. (Sanjay Dutt family news)

शुक्ला कुमार (Shukla Kumar death) यांच्या निधनाने केवळ एका कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संजय दत्त आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळलेला हा दु:खाचा डोंगर अनेकांच्या मनाला चटका लावणारा ठरत आहे.

News Title: Sanjay Dutt’s Family in Mourning as Shukla Kumar Passes Away at the Beginning of New Year

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now