Sania Mirza | ‘तुला सांगत होतो लग्न करु नको’; सोशल मीडियावर सानिया मिर्झा ट्रोल

On: January 20, 2024 3:32 PM
Sania Mirza
---Advertisement---

मुंबई | स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद  हिच्याशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.

सना जावेद (Sana Javed) ही सिनेक्षेत्रात काम करते. ती पाकिस्तानमध्ये नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. ती उर्दू टेलीव्हिजनवर नेहमी झळकते. सनाने 2012 मध्ये शहर-ए-जात मधून पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.

सोशल मीडियावर Sania Mirza ट्रोल

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. सानियाला इजहान नावाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून शोएब आणि सानियाचं बिनसलं असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या.

Sania Mirza ला भारतीयांनी दिले उपदेशाचे डोस

शोएबच्या लग्नानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक सगळीकडे ट्रेंड होत आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील दोघांना ट्रोल केलं जात आहे. सानियाला अनेक भारतीयांनी उपदेशाचे डोस दिले आहेत.

शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट येत आहे. बरेच जण यावर व्यक्त होत आहे. शोएब मलिकबरोबर सानिया मिर्झाला सुद्धा ट्रोल केलं जात आहे.

शोएब आणि सना यांनी लग्न करत सर्वांनाच धक्का दिलाय. शोएब मलिकने त्याच्या लग्नचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या येत होत्या. शोएबनेही अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शोएबने लिहिलं होतं- हॅपी बर्थडे बडी! यासोबतच त्याने सनासोबतचा एक फोटोही शेअर केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shoaib Malik ने ‘या’ अभिनेत्रीसाठी मोडलं सानियासोबतचं लग्न!

Post Office | पोस्टाची भन्नाट योजना; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

PPF Vs SIP, कुठे मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या

Rashibhavishya | ‘या’ राशींनी सावध रहावं, नाहीतर होईल मोठं आर्थिक नुकसान

Ajit Pawar | बाबांनो तुम्हाला विनंती करतो एक, दोन अपत्यावर थांबा नाहीतर…- अजित पवार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now