संदीपान भुमरेंचा मोठा घोटाळा? अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा!

On: February 24, 2026 5:25 PM
Sandipan Bhumre Land Scam
---Advertisement---

Sandipan Bhumre Land Scam | छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गाशी संबंधित जटवाडा येथील जमीन व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर तब्बल 1150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला असून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ड्रायव्हरच्या नावावर हिबानामा? संशयाची साखळी :

अंबादास दानवे यांच्या मते, समृद्धी महामार्गावरील जटवाडा परिसरातील (Jatwada land case) 23 एकर 30 गुंठे जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबानामा (Gift Deed) करण्यात आल्याचा दावा आहे. विशेष म्हणजे संबंधित कागदपत्रांमध्ये हा व्यवहार 1971 साली झाल्याचे नमूद असल्याचे दानवे यांनी सांगितले.

मात्र जावेद रसूल शेख यांचा जन्म 1985 मध्ये झाल्याचा दावा करत दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की, जन्म होण्यापूर्वीच त्यांच्या नावावर जमीन कशी काय नोंदवली जाऊ शकते? या विसंगतीमुळे संपूर्ण व्यवहारावर संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Sandipan Bhumre Land Scam | समृद्धी महामार्ग संपादन आणि 1150 कोटींचा मुद्दा :

दानवे यांच्या म्हणण्यानुसार, जटवाडा येथील ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) प्रकल्पासाठी संपादित केली. संपादनानंतर या जमिनीचे मूल्यांकन सुमारे 1150 कोटी रुपये इतके ठरवण्यात आल्याचे सांगितले जाते. इतक्या मोठ्या मोबदल्यासाठी काही व्यक्तींनी मालकी हक्क सांगत रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.(Sandipan Bhumre Land Scam)

या संदर्भात दानवे यांनी सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्र्यांना पत्र सादर करून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. चौकशी झाल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल, असा त्यांचा दावा आहे. दरम्यान, संदीपान भुमरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या ड्रायव्हरशी संबंधित असा कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसूल हा त्यांचा चालक असला तरी या प्रकरणाशी त्याचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. दानवे यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

News Title: Sandipan Bhumare’s scam of Rs 1,150 crores in Samruddhi Highway

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now